*दीन दुबळ्याची दिवाळी*
*ओट्यावरील गप्पा*
*दीन दुबळ्याची दिवाळी*
लेखक
डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे
(सदरहू लेखक व लेखातील मित्र राजकारणी नाहीत. यांच्या गप्पा ,चर्चा ह्या सामान्य माणसाच्या चर्चा आहेत याचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. )
चार मित्र दिवाळीच्या सुटी निमित्त गावाला आलेले होते. बऱ्याच दिवसांनी भेट झाली त्यामुळे गप्पा फारच रंगल्या होत्या. विषय बरेच होते. पण त्यात मुख्य विषय होता राजकारण, आणि त्यात लाडकी बहीण योजना .
एक मित्र बोलू लागला सरकारने ही योजना आणल्यापासून महिला वर्गाची खूप मजा झाली. काही काम न करता 1500 रुपये मिळतात. दुसरा म्हणाला हे आपलेच पैसे आहेत सरकार ते त्यांना देत आहे. तिसरा म्हणाला पण तुम्ही काहीही म्हणा आज गावागावात दिवाळी मोठ्या उत्साहाने आनंदात साजरी होतेय कारण आज बऱ्याच अश्या वृद्ध , गरीब, असहाय महिला आहेत त्यांना यामुळे गोड धोड खायला मिळाले , चांगले कपडे परिधान करायला मिळाले त्यांची दिवाळी अतिशय उत्तम रीतीने साजरी झाली.
पण खरंच मित्रानो , मागच्या काही वर्षातील परिस्थिती बघा. काय वातावरण होते दिवाळीला . काही विशिष्ट लोकांची दिवाळी साजरी व्हायची . बाकीच्या लोकांना काम , कष्ट शेती, मजुरी, उद्योग यातून वेळच मिळत नव्हता . आणि महिलांची परिस्थिती तर खूपच गंभीर दिवाळी सारखा सण जवळ आल्यावर पैसा नसल्यामुळे हतबल स्थिती होती. आमच्या माता भगिनिंकडे बौद्धिक संपत्ती असून सुद्धा आर्थिक संपत्ती नसल्यामुळे काहीच करू शकत नव्हती. त्यात एक जण म्हणाला,
खरंच ,एक वृद्ध आजी आपल्या विधवा सून सोबत राहत होती तिची दिवाळी आज चांगली साजरी झाली. याचे कारण तिला भाऊंनी म्हणजे सरकारने 1500 रुपये दिले. आपल्याला शहरामध्ये 1500रू. चे मोल काही वाटत नाही पण जी महिला दिवसभर काबाड कष्ट करून 50,100 रू. कमवायची तिला आज दिवसाला 50रू. म्हणजे महिन्याला 1500रू मिळतात. खूपच आनंदी खुश होती.
*असहाय, अपंग, त्याज्य, विधवा, वृद्ध, निराधार महिला वर्गाची व्यवस्था सरकारने केली*
त्यामुळेच अश्या वर्गातील महिलांना बळ , आत्मविश्वास ,ताकद ,शक्ती मिळाली. नाहीतर अठरा विश्व दारिद्र्यात आयुष्य गेले.आता तरी काही काळ सुखाचा जात आहे याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आहे.
मित्रानो खरेच आपण लहान असताना आपल्या घरी सुद्द्धा बिकट परिस्थिती होती. फटाके, फराळ तर सोडाच पण गोड धोड करण्यासाठी पण पैसे नसायचे.
एक मित्र बोलू लागला,माझ्या कडे तर 10रू पण नसायचे. मित्राच्या बहिणीच्या लग्नात 10रू टाकायचे होते पण घरी पैसा नाही. दुसऱ्या मित्राच्या हाता पाया पडलो त्यांनी पण हो हो म्हटले आणि चक्क 5 तास बसवून ठेवले आणि शेवटी नकार देऊन निघुन गेला. मला माझ्या जीवनातील तो क्षण सर्वात असहाय बळहिन दुर्दैवी वाटला. तेव्हाच मी ठरविले की शहरात जायचे आणि पैसा कमवायचा. पण मित्रानो आज कमीत कमी सर्वांकडे 1500 रू. तर आहेत. दीन दुःखी दुबळे यांचे कष्ट निवरण्याच कार्य झाले हे अतिशय ऐतिहासिक घटना घडली.
बाबांनो आपण शहरात गेलो मोजके पैसे बऱ्याच वेळा खिशात काहीच नाही . ह्या श्रीमंत शहरात एक रुपया पण जवळ नाही . ना काम ,ना दाम काय करणार राम . अशी परिस्थिती होती.
तसेच आर्थिक दुर्बल असलेल्या मुलींसाठी शिक्षण पण मोफत . खरंच कोणी काहीही म्हणो आपण काही राजकारणी किंवा समाजकारणी नाही पण एक सामान्य नागरिक म्हणून विचार करा हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो.
लगेच एक मित्र बोलला ,अरे भावांनो असे फुकट पैसा वाटून त्याची कार्यक्षमता धुळीस मिळवत आहेत. त्यांना आयाता पैसा खर्च करण्याची सवय लागेल व कोणीच काम करणार नाही. फुकटचा पैसा खर्च करण्याची सवय फार जड जाईल. तोच एक मित्र मोठ्या आवाजात बोलू लागला, अरे भावांनो ही सुरवात आहे. हळू हळू त्यांना कमीत कमी रोजगार हमी, व संधी मिळेल आणि त्यानुसार त्याना मोबदला मिळेल.
पण आपले आई वडील बहीण, भाऊ, मुलगी ,मुलगा जर असहाय झाले तर आपण त्यांना सोडून देतो काय? त्यांना रस्त्यावर सोडून देतो काय ? नाही ना, मग सरकार पण आपल्या असहाय बहिणींना रस्त्यावर कसे सोडेल?
भाऊबिजेला बायकोच्या धाकाने सख्या बहिणीला शंभर रुपये देणार भाऊ आणि महिन्याला 1500 रू. देणारा सरकार भाऊ.
आपणच तुलना करा
मित्रांनी रात्रीचे बारा वाजले चला आता झोपायला राहिलेल्या गप्पा उद्या सकाळी.असे म्हणून चारही मित्र घरी झोपायला निघून गेले.
Comments
Post a Comment