राजकारणातील महाभारत

 *राजकारणातील महाभारत*


कर्ण अतिशय दानशुर , सज्जन ,चांगला गुहस्थ होता, द्रोणाचार्य अतिशय उत्तम शिक्षक होता, भीष्माचार्य अतिशय सन्माननीय बुद्धिमान, शक्तिमान गृहस्थ होता. पण पक्ष कौरवांचा होता. संगत सोबत, दुर्योधन, दुःशासन ,शकुनी यांची होती. आता हे लोक वाईट होते का ?  सामान्य नागरिकांसाठी . तर उत्तर आहे,  नाही . त्यांनी पण समाजासाठी लोकांसाठी कार्य केले पण त्याच्याजवळ *अभिमान, क्रोध, लोभ, स्वार्थ*.हे अवगुण यांच्याकडे होते. आणि ते एकत्रित येऊन षड्यंत्र रचायचे . तसेच पांडव पण द्युत मध्ये स्वतः च्या पत्नीला धन म्हणून हरले. पण धर्म पांडवांच्या बाजूने होता .आता धर्म म्हणजे युधिष्ठिर नाही. धर्म म्हणजे नीतिमत्ता, विवेक शिलाता , नम्रता, सतशिलाता असल्यामुळे . भगवान श्री कृष्ण यांच्या बाजूने होते.आणि श्री कृष्ण जिथे तिथे विजय नक्कीच. तसेच राजकारणातील राजकीय पक्षांचे पण असेच असते. सगळीकडे कर्ण ,द्रोणाचार्य,भीष्म ,अर्जुन ,युधिष्ठिर असतात. पण भगवान श्री कृष्ण फक्त एकाच पक्षाकडे असतो.

आणि शकुनी मामा पण एकाच पक्षाकडे असतो. म्हणून हे राजकीय युद्ध होत असते. आता कलियुगामध्ये कोण श्री कृष्ण आणि शकुनी मामा कसा ओळखायचा ?  

जो प्रगतीची ,शांततेची ,पर्यावरणाची , सुरक्षतेची , आणि मुख्य म्हणजे मूलभूत गरजांची काळजी घेऊन व्यवस्था करील तो माणसातला देव . आणि कुटीर कारस्थाने, ,संहारक प्रवृत्तीला पाठिंबा, अघोरी, वाईट कर्म करणारे , व्यसन ,वाईट ,चुकीच्या मार्गाने धन ,अर्थ, कर्म करविनारे हे झाले आधुनिक शकुनी. मग प्रत्येकाने ओळखायचे आहे की कोण काय आहे?  

महाभारत हे आजच्या राजकारणाला अतिशय व्यवस्थित बसते. राजकारणामध्ये महाभारतातील प्रत्येक पार्ट ,व्यक्तिरेखा आहे. आणि त्याचे सर्व समर्पक उत्तर हे भगवान श्री कृष्ण यांनी गीतेमध्ये सांगितले आहे. आता आपण सुज्ञ नागरिकांनी सुयोग्य विचार करावा. आणि आपली पुढची रणनीती आखावी.

धन्यवाद 


डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे

Comments

Popular posts from this blog

माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*

*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*