डिंकाचे लाडू*(कल्पक कथा
*डिंकाचे लाडू*(कल्पक कथा)
एक आटपाट नगर होते त्या नगरात नरेंद्र नावाचा एक गृहस्थ राहत होता . संध्याकाळच्या वेळेला मित्रांसोबत गप्पा मारत असताना आपल्या आवडत्या खाण्याच्या पदार्थांवर चर्चा होत होती त्याच वेळेस प्रत्येक जण आपापल्या आवडत्या खाण्याच्या पदार्थांचे नाव सांगत होते आणि तो का आवडतो आणि तो मिळण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात यावर बोलत होते . थोड्यवेळाने नरेंद्र अतिशय गंभीरता पूर्वक बोलू लागला.
नरेंद्र म्हणाला.
डिंकाचे लाडू म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटले का? हो माझ्या पण . !! जगामध्ये माझ्या आवडत्या पदार्थापैकी एक. गावात डिंकाचे लाडूचां तयार होण्याचा वास आला की मी नकळत त्या घराजवळ जाऊन उभे राहायचो . माझ्या आयुष्यात डिंकाच्या लाडूचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
मी लहान असताना म्हणजे पाच वर्षाचा असताना माझी मोठी बहीण बाळंतपणासाठी आमच्या घरी आली होती. आमच्या घराची परिस्थिती अतिशय नाजूक असल्यामुळे बहिणीसाठी लाडू व सुका मेवा आणायची आमची ऐपत नव्हती. म्हणून बहिणीच्या जेठाने लाडूचा सामान आणून दिला व तिच्या नणंदने ते तयार करून दिले.
झाले मी शाळेत गेलो होतो ,!! घरी आल्यावर मला लाडूचा घमघमाट वास येऊ लागला . मी आई ला विचारू लागलो की लाडूचा वास येतो ,लाडू कुठे आहे पण मला त्यावेळी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि मीपण समजले न समजले असे करून बाहेर खेळायला निघून गेलो.
दुसऱ्या दिवशी माझ्या मोठ्या बहिणीला माझी दया आली आणि तिने मला हातावर थोडे लाडूचा भुकुटी दिली आणि सांगितले हे घे !! संपलं आता! ही बाळाची शी आहे! तिथे हात नको लाऊ. मी विचार करू लागलो आणि लगेच लाडू तोंडात टाकून खेळायला निघून गेलो. बहीण काही दिवस राहिली नंतर ती तिच्या घरी निघून गेली. मी पण लाडूला विसरलो .
असेच काही दिवस ,वर्ष लोटले आमच्या गावात आमच्या एका मित्राच्या घरी लाडूचा तयार करण्याचा वास येऊ लागला . मी तिथेच थांबलो त्याला विचारले लाडू केव्हा होतील तेव्हा त्यांनी पण उडवाउडवीची उत्तरे दिली. पण मी पण पक्का त्याच्या घरातून जायचंच नाही म्हणून तिथेच बसून राहिलो . थोड्यावेळाने त्याच्या आईला दया आली आणि तिने मला अर्धा लाडू दिला. मला तर स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला. अतिशय आनंदाने मी एका क्षणात फक्त केला
नंतर डिंकाचे लाडू आणि माझी भेट दहावी झाल्यावर झाली .
जळगावच्या बहिणीच्या घरी गेलो होतो त्यावेळेस मला एक पूर्ण लाडू खायला मिळाला . अजून खायची इच्छा होती पण मनाला आवर घातली. नंतर मग थेट बी ई झाल्यावरच मोठ्या बहिणी च्या घरी लाडू खायला मिळाला पण तो खूपच जास्त दिवसाचा असल्यामुळे त्याची चव बदलली होती. तरी पण मी मोठ्या आनंदात त्याचे ग्रहण केले.
त्यानंतर नोकरीला लागलो पैसा कमाई होऊ लागली . आणि मोठा श्रीमंतीच्या आवेशात आईला म्हटलं की आपण डिंकाचे लाडू करू पण तिने स्पष्ट नकार दिला कारण तीला लाडूच तयार करीत येत नव्हते.
झालं !! माझी राहिली इच्छा अपूर्ण राहिली.
नंतर आमच्या मित्रांचे लग्न व्हायला लागले.
एक मित्र तुषार मला भुसावळला त्याच्या सासुरवाडीला घेऊन गेला त्याच्या सासूबाईंनी मस्त बदाम काजू टाकून दूध दिले व नंतर लाडूची विचारणा करू लागली. पण आमचे मित्र प्राध्यापक महोदयांनी माझा विचार न करता स्पष्ट नकार दिला. मला प्रचंड राग आला.मी बाहेर आल्यावर त्याला खूप बरे वाईट बोललो पण वेळ निघून गेलेली होती. मी नंतर मिठाई च्या दुकानांमधून डिंकाचे लाडू आणले पण त्याची चव मला आवडत नव्हती. मग कालांतराने लग्न झाले आणि बायकोला म्हटले मला डिंकाचे लाडू करून दे मला फारच आवडतात . मग तिने मला सामानाची यादी करून दिली त्याप्रमाने मी सामान आणला व लाडूचा प्रतीक्षा करू लागलो पण इथे पण माझे नशीब आडवे आले.माझी पत्नी कॉलेज मध्ये प्राध्यापक होती तिला सुटीच मिळत नव्हती . लाडू तयार करण्यासाठी वेळच मिळत नव्हता . हळू हळू लाडूचे सामान पोटात जाऊ लागले आणि त्यावेळेसही माझी इच्छा अपूर्ण राहिली.
मला आता नक्की वाटायला लागले की माझी आणि या लाडूचा मागच्या जन्माची वैरी आहे. त्यामुळे माझे आणि त्याचे मिळणं कठीण होत आहे. मी माझ्या डोक्यातून विषय काढून टाकला की आपल्या आयुष्यात डिंकाचे लाडू हा प्रकारच नाही. जगातील सर्व खाण्याच्या वस्तू आहे , लाडू सोडून.
नंतर मी पुण्याला नोकरीनिमित्त आलो आणि एक दिवस असा आला की आमचे मित्र खान सर यांनी लाडू आणला व मला सांगितलं की जेवण झाल्यावर खाऊ . माझं जेवण वरच लक्ष उडाले मी त्या गोड पदार्थाला पाहू लागलो त्याच वेळेस मला फोन आला आणि मी फोन वर बोलू लागलो आणि बोलणं झाल्यावर बघतो तर काय लाडू फस्त झालेला होता. आता मात्र माझा संताप अनावर झाला. माझी तळपायाची आग मस्तकाला भिडली . आणि शपथच घेऊन टाकली की भविष्यात डिंकाचे लाडू कधीच खाणार नाही आणि माझ्या समोरही कोणास खाऊ देणार नाही . आणि जो मला खाऊ घालण्याचा विचार करील तो माझा मला जळविनारा शत्रू असेल . त्याला मी आयुष्यात माफ करणार नाही. आणि अष्याप्रक्रारे माझ्या आयुष्यातील लाडू पुराण समाप्त झाले.
अश्या प्रकारे नरेंद्र ने आपले लाडू पुराण समाप्त केले . आणि
सर्व मित्र माझी प्रत्येक वेळेस झालेल्या फट फजिती ऐकून आनंद दुःख व्यक्त करीत व त्यावर चर्चा करीत आपापल्या घराच्या मार्गाला लागले.
डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे
Comments
Post a Comment