निवडणुकीतील अर्जुन

 *निवडणुकीतील अर्जुन*

(भगवत गीतेतील दिव्य ज्ञान संभ्रमातील अर्जुन साठी अमृत)


डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे 

9860659246

(  हा लेख भगवत गीतेतील श्लोकांचा संदर्भ घेऊन काल्पनिक रित्या तयार करण्यात आला आहे.)


रात्रीची वेळ होती,  विधानसभेच्या निवडणुकीत अर्जुन उमेदवार होता . प्रचंड अश्या गोंधळात गर्दीमध्ये , उत्साहात प्रचार सुरू होता. राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार  असल्यामुळे जबाबदारी ,कर्तव्य होते.  अर्जुन विचार करत होता की माझ्या विरुद्ध माझे मित्र ,नातेवाईक ,मामा, काका,आजोबा, सासरे, मेव्हणे , वडील   व  समतुल्य मंडळी उभी आहेत . मी असा काय यांचा गुन्हा, अपमान केला आहे की हे लोक माझा द्वेष करीत आहे तसेच मी यांची कोणती आर्थिक, मानसिक शारीरिक हानी  केली आहे की ही मंडळी माझ्याविरुद्ध झाली . खूप वाईट दुःख वाटत होतं आणि प्रचंड थकवा आल्यामुळे गाढ झोप केव्हा आली समजलेच नाही.  कितीतरी वेळ झोपेत होतो पण कुठल्यातरी आवाजाने जाग आली आणि आणि डोळ्यासमोर रात्रीचे स्वप्न सचित्र आले .  


अर्जुनने बघितले महाभारतातील युद्ध आणि युद्धामध्ये  अर्जुन आणि भगवान श्री कृष्ण हे  भगवतगीता सांगत आहे पण त्याचवेळी त्याला अर्जुनाच्या जागी तो स्वतः दिसू लागला. 


निवडणूकीतला अर्जुन हात जोडून भगवान श्री कृष्णांना म्हणत आहे.


अर्जुन उवाच

 दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् ॥ १-२८ ॥ सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।

वेपुथश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥ १-२९ ॥

अर्थ 

अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, निवडणूक  युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत; तोंडाला कोरड पडली आहे; शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहात आहेत. ॥ १-२८ (उत्तरार्ध), १-२९ ॥


गाण्डीवं संसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते । न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमवतीव च मे मनः ॥ १-३० ॥


अर्थ 

हातातून सगळे शस्त्र ,शास्त्र गळून पडत आहे, अंगाचा दाह होत आहे. तसेच माझे मन भ्रमिष्टासारखे झाले आहे. त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही. ॥ १-३० ॥


निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव । न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥ १-३१ ॥


अर्थ 

हे केशवा, मला विपरीत चिन्हे दिसत आहेत. निवडणूक  युद्धात आप्तांना हरवून  कल्याण होईल, असे मला वाटत नाही. ॥ १-३१ ॥


न काङ्क्ष विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च । किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ॥ १-३२ ॥


अर्थ 

हे कृष्णा, मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखांचीही नाही. हे गोविंदा, आम्हाला असे राज्य काय करायचे? अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे ? ॥ १-३२ ॥


आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य, भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत, तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून  निवडणूक युद्धात उभे ठाकले आहेत. ॥ १-३३ ॥


आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः । मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा ॥ १-३४ ॥


अर्थ 

गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेहुणे, त्याचप्रमाणे इतर आप्त आहेत. ॥ १-३४ ॥


एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन । अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ॥ १-३५ ॥


अर्थ

हे मधुसूदना, हे मला हरविण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना सोडू  शकत नाही. मग या विजयाची  काय कथा? ॥ १-३५ ॥


निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन । पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः ॥ १-३६ ॥


अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् । यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥ १-४५ ॥


अर्थ

अरेरे! किती खेदाची गोष्ट आहे ! आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख यांच्या लोभाने स्वजनांना  हरवायला अपमानित करायला तयार झालो, हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो बरे ! ॥ १-४५ ॥

अशा रीतीने करुणेने व्याप्त, ज्याचे डोळे आसवांनी भरलेले व व्याकूळ दिसत आहेत, अशा शोक करणाऱ्या आजच्या  अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले. ॥ २-१ ॥


*श्री भगवान उवाच*

श्रीभगवानुवाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् । अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥२- २॥


श्रीभगवान श्रीकृष्ण म्हणाले, 

हे अर्जुना, या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला? कारण हा थोरांनी न आचरलेला, स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्तिकारकही नाही. ॥ २-२ ॥


क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते । क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥२-३॥


म्हणून हे अर्जुना  (अर्थात कलियुगातील अर्जुना), षंढपणा पत्करू नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा, अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन निवडणूक युद्धाला उभा राहा. ॥ २-३ ॥


गुरूनहत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके । हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ॥२-५॥


म्हणून या महानुभाव गुरुजनांना हरवून  अपमान करण्यापेक्षा मी या जगात भिक्षा मागून खाणेही कल्याणकारक समजतो. कारण गुरुजनांना अपमानित करून या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच ना भोगावयाचे. ॥ २-५ ॥


न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः । यानेव हत्वा न जिजीविषाम- स्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥२-६॥


निवडणूक युद्ध करणे व न करणे या दोहोंपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे, हे कळत नाही. किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील, हेही आम्हाला माहीत नाही. आणि ज्यांना हरवून  आम्हाला विजयाचीही इच्छा नाही, तेच आमचे बांधव आमच्या विरुद्ध उभे आहेत. ॥


धर्माद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥२- ३१॥


तसेच स्वतःचा धर्म लक्षात घेऊनही तू भिता कामा नये. कारण क्षत्रियाला, धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. ॥ २-३१ ॥


यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् । सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ॥२- ३२॥


हे पार्था (अर्थात कलियुगातील अर्जुना), आपोआप समोर आलेले, उघडलेले स्वर्गाचे द्वारच असे हे निवडणूक युद्ध भाग्यवान पुरुषांनाच  लाभते. ॥ २-३२ ॥


अथ चेत्त्वमिमं धर्मं संग्रामं न करिष्यसि । ततः स्वधर्म कीर्ति च हित्वा पापमवाप्स्यसि ॥२- ३३॥


परंतु जर तू हे धर्मयुक्त युद्ध केले नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील. ॥ २-३३ ॥


अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् ।

अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् । सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥२- ३४॥


तसेच सर्व लोक तुझी चिरकाळ अपकीर्ति सांगत राहातील. आणि सन्माननीय पुरुषाला अपकीर्ती मरणाहून दुःसह वाटते. ॥ २-३४ ॥


भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः । येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ॥२- ३५॥


शिवाय ज्यांच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास, त्यांच्या दृष्टीने आता तुच्छ ठरशील. ते महारथी लोक तू भिऊन निवडणूक युद्धातून काढता पाय घेतला, असे मानतील. ॥ २-३५ ॥


अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः । निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम् ॥२- ३६॥


तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत तुला पुष्कळसे नको नको ते बोलतील. याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे ? ॥ २-३६ ॥ 


हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् । तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥२- ३७॥


निवडणूक युद्धात तू हरलास  तर प्रसिद्ध होशील  अथवा  जिंकलास तर राज्य भोगशील. म्हणून हे  अर्जुना, तू निवडणूक  युद्धाचा निश्चय करून उभा राहा. ॥ २-३७ ॥


सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥२- ३८॥


जय-पराजय, फायदा-तोटा आणि सुख-दुःख समान मानून निवडणुकीला  तयार हो. अशा रीतीने निवडणूक युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही. ॥ २-३८ ॥


एषा तेऽभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु । बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥२- ३९॥


हे पार्था  , हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात सांगितला. आणि आता कर्मयोगाविषयी ऐक, ज्या बुद्धीने युक्त झाला असता कर्माचे

सिद्धांत ऐक


कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥२- ४७॥


तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे. त्यांच्या फळाविषयी कधीही नाही. म्हणून तू कर्मांच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस. तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस. ॥ २-४७ ॥


दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥२- ५६॥


दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो. ॥ २-५६ ॥


क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः । स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥२- ६३॥


रागामुळे अत्यंत मूढता येते अर्थात अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो. आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो. ॥ २-६३ ॥


यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ४-७ ॥


हे  अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. ॥ ४-७ ॥


परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥


सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो. ॥ ४-८ ॥

योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः । सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥ ५-७ ॥


ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रियनिग्रही आणि शुद्ध अंतःकरणाचा आहे, तसेच सर्व सजीवांचा आत्मरूप परमात्माच ज्याचा आत्मा आहे, असा कर्मयोगी कर्मे करूनही अलिप्त राहातो. ॥ ५-७ ॥

नैव किञ्चित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् । पश्यशृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपञ्श्वसन् ॥ ५-८ ॥ प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि । इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥ ५-९ ॥


सांख्यायोगी तत्त्ववेत्त्याने पाहात असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, भोजन करीत असता, चालत असता, झोपत असता, श्वासोच्छवास करीत असता, बोलत असता, टाकीत असता, घेत असता, तसेच डोळ्यांनी उघडझाप करीत असतानाही सर्व इंद्रिये आपापल्या विषयांत वावरत आहेत, असे समजून निःसंशय असे मानावे की, मी काहीच करीत नाही. ॥ ५-८, ५-९ ॥


ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः । लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ॥ ५-१० ॥


जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून कर्मे करतो, तो पुरुष पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. ॥ ५-१० ॥


कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि । योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ॥ ५-११ ॥ कर्मयोगी ममत्वबुद्धी सोडून केवळ अंतःकरणाच्या शुद्धीसाठी इंद्रिये, मन, बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारे आसक्ती सोडून कर्म करतात. ॥ ५-११ ॥


जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः । शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥ ६-७ ॥


थंड-उष्ण, सुख-दुःख इत्यादी तसेच मान-अपमान यांमध्ये ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती पूर्णपणे शांत असते, अशा स्वाधीन आत्मा असलेल्या पुरुषाच्या ज्ञानात सच्चिदानंदघन परमात्मा उत्तमप्रकारे अधिष्ठित असतो; म्हणजेच त्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काही नसतेच. ॥ ६-७ ॥


*अर्जुन उवाच*

कच्चिन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति । अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि ॥ ६-३८ ॥ हे महाबाहो श्रीकृष्णा, भगवत्प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला व आश्रयरहित असलेला पुरुष छिन्न-विच्छिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत? ॥ ६-३८ ॥


*भगवान उवाच*

तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः । कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ॥ ६-४६ ॥ तपस्वी लोकांपेक्षा योगी श्रेष्ठ आहे. शास्त्रज्ञानी पुरुषांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानला गेला आहे. आणि सकाम कर्मे करणाऱ्या माणसांपेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू निवडणूक युद्ध कर


यदह‌ङ्कारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे । मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति ॥ १८-५९ ॥ तू अहंकार धरून मी  निवडणूक युद्ध करणार नाही, असे मानतोस, तो तुझा निश्चय व्यर्थ आहे, कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्तीने युद्ध करावयास लावील. ॥ १८-५९ ॥


स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा । कर्तुं नेच्छसि यन्मोहात्करिष्यस्यवशोऽपि तत् ॥ १८-६० ॥ हे अर्जुना, जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस, तेही आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बद्ध असल्यामुळे पराधीन होऊन करशील. ॥ १८-६० ॥


ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति । भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ १८-६१ ॥ 


हे अर्जुना, अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने शरीररूपी यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मांनुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे. ॥ १८-६१ ॥


तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत । तत्प्रसादात्परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् ॥ १८-६२ ॥ 


हे अर्जुना, तू सर्व प्रकारे त्या परमेश्वरालाच शरण जा. त्या परमात्म्याच्या कृपेनेच तुला परमशांती आणि सनातन परमधाम मिळेल. ॥ १८-६२ 


कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा । कच्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनञ्जय ॥ १८-७२ ॥ 

हे  अर्जुना, हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस का? आणि हे धनंजया (अर्थात अर्जुना), तुझा अज्ञानातून उत्पन्न झालेला मोह नाहीसा झाला का? ॥ १८-७२ ॥


अर्जुन उवाच नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ॥ १८-७३ ॥ 

अर्जुन म्हणाला, हे अच्युता (अर्थात श्रीकृष्णा), आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला आणि मला स्मृती प्राप्त झाली. आता मी संशयरहित होऊन राहिलो आहे. म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करीन. ॥ १८-७३ ॥


स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर आल्यावर मी दृढ संकल्प केला की  मी जोमाने उत्साहाने निवडणुकीत विजय प्राप्त करील व धर्माचे रक्षण करून मानव जीवन सुखी समृद्ध आनंदी तसेच सात्विक  , राजसीक, तामसिक विचार ,सत्व, रज तम समभाव कसे होईल यावर कार्य करील.

Comments

Popular posts from this blog

माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*

*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*