जर जीवनच नसेल तर कसले कार्य आणि काय?

 *जर जीवनच नसेल तर कसले कार्य आणि काय?*


डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे 

(Thermal Engineering Teacher )

(हे माझे वैयक्तिक सकारात्मक विचार आहेत .कोणीही याचा वेगळा अर्थ घेऊ नये. )

आज सर्वात महत्वाची घडामोड आणि उद्देश एकच sustainable development goals. 


मित्रानो विचार करा . जर मानवाच्या चुकीमुळे ,दुष्कर्मामुळे जर पृथ्वी मातेचेच अस्तित्व धोक्यात येत असेल तर काय करायच्या बाकीच्या घडमोडी. 


धन ,संपत्ती, अधिकार ,पद, राजनीती, मुल बाळे, सर्वच प्रिय जन व आपले अस्तित्वच नाही तर कश्याला एवढ्या घडामोडी.

मित्रानो मी 27वर्ष thermodynamic हा विषय शिकवला आहे . जगातला कोणत्याही आयआयटी ,NIT किंवा टॉप विद्यापीठाच्या thermodynamic च्या प्राध्यापकाला विचारा. Thermodynamic च्या तीन नियमाप्रमाणे हे संपूर्ण विश्व संचालित होत असते . यावर मी मागे अनेक लेख लिहिलेले आहे त्याबद्दल मी चर्चा करणार नाही. पण entropy या thermodynamic च्या मुद्याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित करू इच्छितो.प्रत्येक क्षणाला प्रत्येक श्वासाला ,प्रत्येक कार्याला ही वातावरणात वाढत आहे . त्यामुळे बाहेरील वातावरणाची उष्णता वाढत. आहे . मित्रानो जर आपल्या शरीराचा किंवा कुठल्याही वस्तू च्या उष्णतचे फरक किंवा अंतर हे कमी झाले तर नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात. मित्रानो हे केव्हांना केंव्हा घडणारच आहे. पण आपल्या मानवाच्या चुकीमुळे घडत असलेले बदल रोकण्यास मदत होऊ शकते. आणि ग्रह संरक्षण व संवर्धनासाठी मदत होऊ शकते. 

मित्रानो विषय फार गंभीर आहे प्रत्येकाने विचार करावा. व SDG च्या 17 ॲक्टिव्हिटी साठी काम करावे . हे दुसऱ्यासाठी नाही .स्वतः साठी स्वतःच्या पुढच्या पिढीसाठी कार्य करा नाही करू या. एकत्र या संघटित विचार करा. एकत्रित कार्य करूया. हजारो लाखो कोटी जणांच्या बुद्धिमत्तेला चालना देऊन पृथ्वी मातेच्या संरक्षणासाठी कार्य करू या. 

माझी सर्व thermodynamics च्या प्राध्यापकांना विनंती आहे की आपले विचार येथे स्पष्ट करा आणि एकत्र येऊ आणि कार्य करू.


एंट्रोपी बदलाचा परिणाम विश्वाच्या विविध पैलूंमध्ये, सर्वात लहान आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंत पाहिला जाऊ शकतो. येथे काही उदाहरणे देत आहे.:


 एन्ट्रोपी बदलाचे माणसावर होणारे परिणाम_


 1. *म्हातारपण*: एन्ट्रॉपीमध्ये वाढ म्हातारपणाच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. जसजसे आपले वय वाढते तसतसे आपल्या पेशी कमी व्यवस्थित होतात. म्हणजे molecule चा randomness वाढतो आणि आपली शारीरिक कार्ये कमी कार्यक्षम होतात.

 2. *रोग*: एन्ट्रॉपी बदल चा सरळ संबंध रोगांशी लावू शकतो. उदाहरणार्थ, रक्तामधील entropy वाढली की रक्ताचे रोग होऊ शकतात. ब्लड प्रेशर ईत्यादि .

 3. *थकवा*: शरीरातील ऊर्जेचा साठा कमी झाल्यामुळे एंट्रॉपी कमी झाल्यामुळे थकवा येऊ शकतो.

असे अनेक उदाहरणे मी देऊ शकतो . शरीरातील प्रत्येक अवयव हा entropy वाढल्यामुळे किंवा कमी झाल्याने प्रभावित किंवा रोगग्रस्त होऊ शकतो.


 एनट्रॉपी बदलाचे पर्यावरणावर होणारे परिणाम


 1. *हवामान / वातावरण बदल*: एन्ट्रॉपीमध्ये वाढ हा हवामान बदलाशी संबंधित आहे. जसजसे पृथ्वीचे तापमान वाढते तसतसे वातावरण आणि समुद्राची एन्ट्रॉपी देखील वाढते, ज्यामुळे हवामानाच्या अधिक गंभीर समस्या घटना घडतात.   

 2. *प्रदूषण*: प्रदूषण बदल हे एंट्रॉपी वाढीचे प्रमुख कारण आहे . उदाहरणार्थ, वातावरणात प्रदूषण वाढल्यामुळे पंचमहाभूते आपली निसर्ग सीमा बदलतात . 

 3. *पर्यावरणप्रणाली व्यत्यय*: सजीवांची एंट्रॉपी कमी झाल्यामुळे शरीरात बदल होतो आणि त्यांचे प्रजनन ,ऊर्जा , शक्ती बल आणि त्यांचे नैसर्गिक संतुलन बिघडल्यामुळे पर्यावरणातील व्यत्यय येऊ शकतो.

 प्राचीन काळापासून ऋषी मुनींनी पर्यावरण व जीव सृष्टी यांचा समतोल राखण्याचे कार्य केले. जसे की सात्विक राजसिक व तामसिक अन्न मध्ये सात्विक आहार करायला सांगितला आहे. तामसिक अन्न घेतल्यामुळे संताप ,लोभ मोह स्वार्थ वाढतो व शरीराची entropy वाढते. 

जसे अन्न तसे विचार तशी प्रवृत्ती आणि तसे त्याच्या शरीरातील मानसिक बदल .

Comments

Popular posts from this blog

माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*

*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*