सामान्य नागरिकांचे पत्र
 *शेतकऱ्याचे कापणीस आलेले केळीचे घड अज्ञात व्यक्तींनी कापून नुकसान केले* ही दुर्दैवी बातमी कळताच अत्यात दुःख झाले . मनात विचारांची प्रचंड काहुराकाहुर  निर्माण झाली. प्रचंड संताप ,तिरस्कार निर्माण झाला. अश्या दुर्दैवी घटना घडतातच कश्या? एक तर असे कृत्य करणारे लोक हे मानसिक विकृत,  नाहीतर सुड भावनेने पेटलेले असतात. पिकाचे नुकसान करणे म्हणजे विकृती आहे. शेतकऱ्याचे सर्व श्रम ,कष्ट, पैसा ,वेळ वाया जातो.   शेतकऱ्याची सर्व प्रकारे शारीरिक आर्थिक मानसिक हानी होते. तर याला जबाबदार कोण?  तो विकृत मनुष्य का ? सूड भावनेने पेटलेला तो राक्षस?  मित्रानो या लोकांना थोडा तरी देवाचा, पापाचा ,शासनाचा , सरकारचा धाक नाही का?  मग इथे सरकार काय करते? ग्रामपंचायत तलाठी , ग्रामसेवक, विविध कार्यकारी सोसायटी , पंचायत समिती जिल्हापरिषद, कृषी उत्पन्न बाजारसमिती पोलिस ,न्याय व्यवस्था,आमदार, खासदार ,मंत्री यांचा थोडाही धाक शिल्लक राहिला नाही का? अश्या लोकांचा माज एवढा का वाढला? दुसऱ्याला दुःखी करून स्वतः आनंद घेणाऱ्या या राक्षसांना सजा कधी मिळणार का?विकृत कार्य करणाऱ्या  लोकांमध्ये प्रचं...