*साध्या सरळ भाषेत रिसर्च*
*साध्या सरळ भाषेत रिसर्च*
डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे
(डीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट ; JSPM' Rajarshi Shahu College of Engineering Tathawade Pune)
रिसर्च म्हणजे आपल्याला डोळ्यासमोर येते ते एक भयंकर चिंताग्रस्त असलेला शास्त्रज्ञ आणि तो लॅबोरेटरी मध्ये प्रयोग करीत आहे. आणि जगावेगळे हावभाव करीत काहीतरी नवीन करीत आहे. हे सगळे सिनेमामध्ये . आता वास्तवात रिसर्च आणि त्याच्या ॲक्टिव्हिटी आपण समजावून घेऊ.
रिसर्च म्हणजे मराठीत संशोधन. काहीतरी नवीन तयार करणे. किंवा आहे त्यामध्ये नवीन शोधणे . आता रिसर्च कसा करायचा. त्यासाठी काय काय लागणार. तर त्यासाठी टॉपिक पाहिजे. म्हणजे प्रोजेक्ट पाहिजे की त्यावर आपण आपले काम करणार आहोत. आता रिसर्च प्रोजेक्ट चे भरपूर शाखा निहाय प्रकार आहे. आपल्या प्रोजेक्ट प्रमाणे literature review , survey, methodology, रिझल्ट आणि सारांश करून आपल्या कार्याचे
सार्वजनिक मान्यतेसाठी पेटंट, कॉपी राईट , रिसर्च पेपर पब्लिकेशन हे करणे महत्वाचे असते.
आता रिसर्च सेंटर नी हे सर्व पेपर Scopus , SCI, WOS, UGC, peer review karun विभागाप्रमाणे एकत्रित करून त्यामध्ये Quartile ranking प्रमाणे लावावे.
आता दुसरा मुद्दा म्हणजे रिसर्च प्रपोजल. भारतात व बाहेर अनेक अश्या खाजगी व सरकारी संस्था आहे की त्या संशोधनासाठी पैसा देतात. फक्त apply करायला पाहिजे.
आता प्रपोजल कसे लिहायचे. ते एक कौशल्य आहे. ते तज्ञाकडून शिकून घ्यायचे . व स्वतः आपल्या हस्तक्षारत लिहायचे. जर त्याची गरज ,महत्व समाजाला किंवा तंत्रज्ञानाला असेल तर प्रोजेक्ट हा सिलेक्ट होतो आणि चांगली रकम ही शोधर्थिला मिळते. त्यांनी त्याचा योग्य वापरकरून शोध कार्य करावे. आता रिसर्च सेंटर नी काय करायचे? तर विविध प्रकारच्या खाजगी, सरकारी funding एजन्सी ची माहिती उपलब्ध करून द्यावी. प्रपोजल कसे लिहायचे याचे शिक्षण द्यावे . प्रोजेक्ट निवड झाल्यावर त्याचे डॉक्युमेंट्स तयार करावे.
आता कन्सल्टन्सी सर्व्हिसेस चा विचार करू.
आपल्याकडे बरेच PhD किंवा उच्चशिक्षण घेतलेले लोक आहेत. त्यांचा विषय , अनुभव ,संशोधन कार्य याचे माहितीपत्रक तयार करून त्याला सर्व सोशल मीडिया टाकावे. व त्यानुसार आपल्या विशेष ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग वापर करून कसा समोरच्याचा फायदा होईल हे पटवून देण्याची गरज आहे. Consultancy मिळाल्यानंतर सर्व पत्रलेखन, इमेल्स , फील्ड visit, bank documents व अन्य कागदपत्र व्यवस्थित मांडणी करणे आवश्यक आहे.
आता रिसर्च कार्यात महत्वाचं मुद्दा आहे पेटेंट्स, कॉपी राईट. संशोधनचौर्य हा प्रकार रोकण्यासाठी पेटंट कॉपी राईट अनिवार्य आहे. आता पेटंट कसे लिहायचे, कुठे करायचे ,कसे, कुणी, केव्हा ,कधी करायचे हे सर्व प्रश्न संशोधकाला असतात. तर त्यांनी आधी याचे सर्व माहिती ही IPR वेबसाईट किंवा अधिकृत website वरून घ्यायची. व योग्य मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन घ्यावे .
आता रिसर्च सेंटर नी काय करायचे?
संशोधकाला patents , copy rights चे शिक्षण योग्य मार्गदर्शकाकडून उपलब्ध करून द्यावे.
त्यानंतर त्याची नोंद म्हणजे प्रोसेस पेटंट , प्रॉडक्ट patents , design patents etc. अश्या विविध विषयांनुसार करावी.
Research center नी पुढील कागदपत्रे तयार करणे आवश्यक आहे
१) Research paper publication
२) research funding
३) consultancy
४) patents copy rights
५) conference organised and attended
६) peer reviewed journal publications
७) research news publication
८) research compitition
९) research essay writing competition
१०) research award
११) research incentives
१२) research promotion schemes
१३) research culture
१४) research facilities
१५) research centre with equipment
१६) research motivation and inspiration and support
Comments
Post a Comment