सामान्य नागरिकांचे पत्र

 *शेतकऱ्याचे कापणीस आलेले केळीचे घड अज्ञात व्यक्तींनी कापून नुकसान केले* ही दुर्दैवी बातमी कळताच अत्यात दुःख झाले . मनात विचारांची प्रचंड काहुराकाहुर निर्माण झाली. प्रचंड संताप ,तिरस्कार निर्माण झाला.

अश्या दुर्दैवी घटना घडतातच कश्या?

एक तर असे कृत्य करणारे लोक हे मानसिक विकृत, नाहीतर सुड भावनेने पेटलेले असतात. पिकाचे नुकसान करणे म्हणजे विकृती आहे. शेतकऱ्याचे सर्व श्रम ,कष्ट, पैसा ,वेळ वाया जातो. 

 शेतकऱ्याची सर्व प्रकारे शारीरिक आर्थिक मानसिक हानी होते. तर याला जबाबदार कोण? 

तो विकृत मनुष्य का ? सूड भावनेने पेटलेला तो राक्षस? 

मित्रानो या लोकांना थोडा तरी देवाचा, पापाचा ,शासनाचा , सरकारचा धाक नाही का? 

मग इथे सरकार काय करते? ग्रामपंचायत तलाठी , ग्रामसेवक, विविध कार्यकारी सोसायटी , पंचायत समिती जिल्हापरिषद, कृषी उत्पन्न बाजारसमिती पोलिस ,न्याय व्यवस्था,आमदार, खासदार ,मंत्री यांचा थोडाही धाक शिल्लक राहिला नाही का? अश्या लोकांचा माज एवढा का वाढला? दुसऱ्याला दुःखी करून स्वतः आनंद घेणाऱ्या या राक्षसांना सजा कधी मिळणार का?विकृत कार्य करणाऱ्या लोकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण व्हायला पाहिजे. आपण सामान्य माणसांनी पण अश्या लोकांचं शोध घेऊन त्यांची माहिती सरकारपर्यंत पोहोचविली पाहिजे. पीक सुरक्षेसाठी सरकारी व्यवस्था तर आहेच पण लोकांनी एकत्र येऊन या करिता कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. 


*सामान्य नागरिकांचे पत्र*


*मा सर्व समाज सेवक, राजकारणी ,अधिकारी, सरपंच, पंचायत समिती सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष, , जि प सभापती, आमदार खासदार मंत्री व सर्व मान्यवर समजतील घटकांसाठी एक सामान्य शेतकऱ्याच्या मनातील लिहिलेले पत्र*


मा.

साहेब/ दादासाहेब/ भाऊसाहेब/ आबासाहेब/बापूसाहेब/ बाळासाहेब / राजेसाहेब/दांनविर/ शूरवीर/समजाविर/ सर / इतर सर्व राजमान्य, स्व मान्य , मान्यवर 

यांच्या सेवेशी.

सर्व जण हिताय व सर्व जण सुखाय हि भावना व्यक्त करून काही माफक अपेक्षा करीत आहे.

राजकारणात, समाजकारणात आहेत याचा अर्थ समाज जागृती, प्रबोधन समाजकार्य विकास या भावनेने . गावातील वंचित लोकांसाठी ,गरीब ,असहारा,वृध्द, अनाथ,अपंग,निराधार लोकांसाठी व त्यांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा देण्यासाठी, नागरिकांचा मानसिक, शारीरिक, अध्यात्मिक विकास करण्यासाठी. गाव हे कुटुंब व गावातील प्रत्येक व्यक्ती सभासद. त्यांचा विकास करण्याची जबाबदारी प्रमुखाची. प्रत्येक नागरिक सुख , समाधान, शांती ऐश्वर्य समृध्दी पूर्वक जगण्याची जबाबदारी प्रमुखाची. न्याय, सुरक्षा,मूलभूत. सुविधांची जबाबदारी प्रमुखाची.

ग्रामविकास होण्यासाठी अपेक्षा पुढीप्रमाणे. 

आदर्श ग्रामासाठी कार्य

१) मूलभूत सुविधां( अन्न सुरक्षा, वस्त्र,निवारा)

२)मूलभूत शिक्षणाची सुविधा

३)सार्वजनिक वाचनालय

४)मूलभूत आरोग्य सुविधा

५)सुंदर अत्याधुनिक सार्वजनिक बगीचा 

६)शेती तक्रार व सल्ला, संशोधन कार्यालय

७)न्याय व तक्रार निवारण केंद्र

८) आत्मनिर्भर ग्राम केंद्र

९) योग ,व्यायाम ,खेळ सुविधा

१०)रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मदत केंद्र

११) रस्ते ,लाईट, दुतर्फा झाडं ,वृक्ष संवर्धन

१२)नागरिक मदत केंद्र

१३) कन्या व महिला सबलीकणासाठी कार्य

१४) गरीब, अशिक्षित,असहरा,अनाथ, वृध्द लोकांसाठी कार्य 

१५) आपत्ती व्यवस्थापन व निवारण केंद्र.

१६)शेती पूरक व्यवसाय व इतर व्यवसाय प्रोत्साहन, संवर्धन व संरक्षण केंद्र

१७)साक्षरता केंद्र

१८) डिजिटल अवेयरनेस व मार्गदर्शन केंद्र

१९)शेती भाव व इतर व्यवसाय हमी भाव 

२०) हुशार विद्यार्थी , विशेष कार्य करणारी नागरिक प्रोत्साहन पुरस्कार

२१) संस्कार केंद्र

२२)भारतीय संविधान अभ्यास केंद्र

२३) अर्थ वाढि करता योजना

२४)शेजारी गांव मित्र संवर्धन योजना

२५)ग्रामविकास वार्षिक प्लान

वरील कार्य आपण व आपले सहकारी पूर्ण करणारच हा विश्वास .

धन्यवाद


 डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे

@please forward it

Comments

Popular posts from this blog

माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*

*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*