*लाखात एक विकृत शिक्षक आणि मानसिकता*
(सूचना - कृपया हे सामान्य निरीक्षण आहे कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तिविषेश चा कुठलाही संबंध नाही. विकृत प्रवृत्तीशी लढा व उपाय हे साधे सरळ भाषेत मांडले आहे )
डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे
संध्याकाळची वेळ होती ,आम्ही चार शिक्षक मित्र निवांत बसून गप्पा मारत होतो . त्यात सर्व प्रकारच्या शैक्षणिक चर्चा रंगल्या होत्या. शिक्षण ,पद्धती, आणि त्यामधील असलेली संस्कृती आणि त्याचा होणारा परिणाम .
आता आम्ही शिक्षक संस्कृती जोपासण्यासाठी असलेल्या मुद्द्यांचा विचार करत होतो आता इथे सर्व शिक्षणांबद्दल चर्चा नाही तर शिक्षकांमध्ये असलेल्या काही विकृत प्रवृत्तीच्या शिक्षकांबद्दल आहे त्यामध्ये शिक्षक पदोन्नाती पद प्राप्त झालेला असेल किंवा काही विशेष अधिकार प्राप्त झालेला असेल . यामध्ये काही शिक्षक हे अतिशय उच्च संस्कृती , सभ्यता शिस्त आणि कर्तव्यदक्ष असतात . येथे विषय आहे काही लोकांच्या विकृत मानसिकतेचे .गर्वाने इतरांचा अपमान करणे , ही गंभीर बाब आहे. या विषयावर चर्चा सुरू झाल्या. त्यामध्ये प्रत्येकाने विचार मांडले . अशा वागणुकीमुळे महाविद्यालयाच्या वातावरणावर नकारात्मक परिणाम होतो. पदाचा गर्व आणि अपमान करणाऱ्या शिक्षकाचे उद्दिष्ट आणि शिक्षकाच्या वागणुकीत बेतालपणा दिसून येतो. सत्तेचा गैरवापर करून निर्णय स्वतःच्या मर्जीनुसार घेतात, इतरांचा सल्ला घेतला जात नाही. तसेच संवेदनशीलतेचा अभाव असून शिक्षक, विद्यार्थी, किंवा पालकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. महत्वाचे म्हणजे सार्वजनिक अपमान करणे याला तो पुरुषार्थ समजतो व मीच किती योग्य ,प्रामाणिक, मेहनती, आहे व समोरचे तुच्छ आहे अश्या भ्रांतमध्ये वावरातो. शिक्षक, विद्यार्थी किंवा इतर कर्मचाऱ्यांना खुलेआम वाईट वागणे , अपमान करणे ,टाकून बोलणे. दुसऱ्याच्या कमीपणाला तुच्छतेने हसणे असे काही अनैसर्गिक कृत्य प्रकार तो करत असतो.: इतरांकडून आलेल्या सूचना किंवा टीका स्वीकारत नाहीत.
अशा वागणुकीचे दुष्परिणाम दीर्घकालीन परिणाम हे शिक्षकांवर होतात, आत्मविश्वास घटतो, त्यामुळे अध्यापनाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. कामाच्या ठिकाणी नकारात्मक वातावरण तयार होते, जेणेकरून शिक्षक निरुत्साही होतात. महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांवर परिणाम होतो.आणि शिक्षकाचा आदर कमी होतो, आणि शिस्त ढासळते. शिक्षणासाठी प्रेरणा मिळत नाही, ज्यामुळे विद्यार्थी नैतिकदृष्ट्या कमी होतात. आणि संस्थेचे संघटनात्मक नुकसान होते आणि याला हेच विकृत मानसिकतेचे शिक्षक असतात. शिक्षक, विद्यार्थी, आणि पालक यांच्यात गैरसमज वाढतात. महाविद्यालयाची गुणवत्ता व प्रतिष्ठा कमी होते.
अश्या विकृत शिक्षकासाठी फीडबॅक प्रक्रिया अत्यंत आवश्यक असते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून शिक्षकाच्या वागणुकीवर फीडबॅक घ्यावा. -त्यांच्या चुकीच्या वागणुकीचे स्पष्ट आणि नम्रपणे निरीक्षण करावे.
आता महतेचे म्हणजे संस्थेने तक्रार निवारण समितीचे आयोजन तत्काळ करावे. तसेच शिक्षक किंवा इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि गोपनीय तक्रार नोंदवण्यासाठी एक प्रक्रिया सुरू करावी. व्यवस्थापनाने शिक्षकांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवावे.
आणि सर्वच शिक्षकांना नेतृत्व विकास कार्यक्रमसाठी प्रेरित करावे शिक्षकना नम्रता, सहकार्य, आणि नेतृत्व कौशल्यांसाठी प्रशिक्षण देणे. व त्यांना मानवी मूल्ये आणि संस्थात्मक उद्दिष्टे यांचे महत्व पटवून देणे हे महत्वाचे कार्य संस्थेचे असते.
महाविद्यालयीन व्यवस्थापनाने अशा वर्तनाबद्दल गांभीर्याने लक्ष घालून योग्य त्या उपाययोजना कराव्यात. आवश्यक असल्यास, त्यांना त्यांच्या भूमिकेत सुधारणा करण्यासाठी इशारा किंवा वेळ दिला जावा.
महाविद्यालयाचा शिक्षक हा संस्थेच्या संस्कृतीसाठी एक आदर्श असतो. जर तो पदाचा गर्व सोडून नम्रतेने आणि सर्वांना सोबत घेऊन काम करेल, तर महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. शिक्षक, विद्यार्थी, आणि पालकांसोबत चांगले नाते निर्माण केल्याने सकारात्मक शैक्षणिक वातावरण तयार होईल.
धन्यवाद
Comments
Post a Comment