लक्ष्मणराज - राजकारणातील यशोगाथा
लक्ष्मणराज - राजकारणातील यशोगाथा
राजकारणी बनायचं आहे? राजकारणात करिअर करायचे आहे तर मग हा लेख जरूर वाचा
लेखक- डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे
( सदरहू लेखातील विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार असून याचा विपरीत अर्थ लावू नये )
राजकारण याचा सरळ अर्थ “राज उपभोगण्यासाठी केलेले कारण” म्हणजे कार्य. आता राजकारण कोणि करावे ? कसे ,केंव्हा ,कुठे करायचे असा प्रश्न पडला असेल. आणि हे करून फायदा काय? तर मित्रांनो सांगतो. अगदी बालवयात म्हणजे माध्यमिक शाळेत असल्यापासून याची सुरवात करायची.
आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये तसेच चाणक्य नीति मध्ये लिहिले आहे की साम, दाम, दंड, भेद व स्त्री याचा योग्य वापर करून सत्ता उपभोगली पाहिजे.
तसेच अनेक राजे, महाराजे, देवता, राक्षस यांच्या कथांच्या माध्यमातून राजकारण, समाजकारण, धर्म, अधर्म, पाप पुण्य शिकविले गेले आहे. राजकारणावर बरेच ग्रंथ प्रसिद्ध आहे त्यापैकी चाणक्य नीति, विदुरनीति, कृष्ण नीति ई. प्रसिद्ध आहे. मग आपण हे सगळे वाचायचे का? तर उत्तर "हो". पण त्यातील काही महत्वाचे मुद्दे जरी अभ्यासले तरी आपल्याला प्राथमिक माहिती मिळते.
मग प्रश्न पडतो की त्यावेळची परिस्थिती माहिती आताच्या पिढीला युगात लागू पडते काय? तर मित्रांनो उत्तर आहे, हो! आपल्याला त्याची फिलॉसॉफी अभ्यासायची आहे. आता आपण याचा कथेच्या स्वरूपातील अभ्यास करू.
एक छोटेसे टुमदार गाव होते. त्या गावात "लक्ष्मण" नावाचा मुलगा त्याच्या आई वडील व कुटुंबासोबत राहत होता. वडिलांची परिस्थिती अतिशय सामान्य , हलाखीची; पण मुलगा खूप हुशार आणि काहीतरी नवीन करण्याची तयारी, ईच्छा. पण वडील इतके गरीब आणि साधारण, पापभिरू की त्यांना गावातील लोक काय पण शेजारीपाजारी नातेवाईक मित्रमंडळी सुद्धा विचारात नव्हती. गावातील निवडणूक जरी असली तरी त्यांना कुणीही विचारात नव्हते. अश्या बिकट , विपरीत परिस्थितीत मुलाचे स्वप्न खूप मोठे . मुलगा गावातील श्रीमंत ,पुढारी लोकांचे वागणे बघून त्याला पण वाटायचे आपणही असेच होऊ . गावातून जर कोण्या अधिकाऱ्याची गाडी गेली तर त्याला वाटायचे आपण अधिकारी होऊ. जर कोण्या मंत्रांच्या गाड्यांचा ताफा बघितला तर त्यालाही वाटायचे की आपण मंत्री होऊ. तो मुलगा तासनतास स्वप्न बघतं राहायचा. विचार करायचा. आणि हे साध्य करण्यासाठी काय करावे लागेल याच्या साठी कोणता मार्ग आहे. याचा अभ्यास करायचा. तो पंधरा वर्षाचा झाला त्याच्या हातात चाणक्य नीति हे पुस्तक आले. त्यांनी ते पुस्तक पूर्ण पणे वाचून टाकले . व शाळेतील एका ज्ञानी शिक्षकाला अनेक प्रश्न विचारून आपल्या मनातील शंकेचे निरसन करून घेतले. आता त्याच्या लक्षात आले की साम, दाम, दंड, भेद हे चार मार्ग महत्वाचे आहे.
आता साम म्हणजे काय? अर्थ खालीलप्रमाणे:
साम (सांप्रदायिकता / संवाद):
याचा अर्थ आहे शांततेने, समजुतीने, विनंतीने किंवा संवादाच्या माध्यमातून एखाद्याला आपले म्हणणे पटवून देणे.
उदाहरण: समजावून सांगणे, समोरच्याशी विश्वासाने बोलणे.
दाम (लोभ / अर्थप्रदान):
याचा अर्थ आहे पैशाने किंवा अन्य लाभांच्या माध्यमातून एखाद्याला आपल्याला अनुकूल करणे.
उदाहरण: घसघशीत ऑफर देऊन सहकार्य मिळवणे.
दंड (शास्ती / शिक्षा):
याचा अर्थ आहे शिक्षा देऊन किंवा बलाचा वापर करून एखाद्याला वश करणे.
उदाहरण: शत्रूला पराभूत करणे किंवा कायदेशीर कारवाई करणे.
भेद (फूट / गोपनीय माहितीचा उपयोग):
याचा अर्थ आहे गुप्त माहितीचा उपयोग करून किंवा फूट पाडून आपल्या फायद्यासाठी परिस्थिति बदलवणे.
उदाहरण: शत्रूच्या गटामध्ये फूट पाडणे, माहिती उघड करून दबाव आणणे.
एखाद्या माणसाने शत्रूशी पहिल्यांदा साम वापरून समेट करण्याचा प्रयत्न करावा, न झाल्यास दाम देऊन तडजोड करावी, तरीही उपयोग न झाल्यास दंड वापरावा, आणि शेवटी भेद वापरून त्याला कमजोर करावे.
अश्या प्रकारची प्राथमिक माहिती अभ्यासली व त्यावर चिंतन , मनन केले.
आता लक्ष्मण विचार करू लागला की आपल्या जवळ तर काहीही नाही कोणीच गुरू किंवा राजकीय गुरू पण नाही. परिस्थिती अनुकूल नाही. मग त्याच्या तल्लख बुद्धीचा वापर करून त्यांनी सुरवातीला "साम" या नीतीचा वापर करायचे ठरविले . झाले ! लहान मुलगा तो . त्याच्या मनात जसे आले तसा तो विचार करू लागला.
साम नीति साठी सर्व महत्वाचे म्हणजे संवाद साधणे. आणि संवाद साधण्यासाठी वाक चातुर्य अतिशय महत्वाचे. म्हणजे संभाषण कौशल्य आले पाहिजे मग त्यासाठी लक्ष्मण वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊ लागला. सुरवातीला कठीण गेले. मुलं मुली शिक्षक हसत होते. पण निर्धार पक्का होता त्यामुळे त्याला अतिशय सुंदर भाषण कला अवगत झाली.
आपले मुद्धे तो प्रखरपणे लोकांसमोर मांडू लागला. विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करू लागला. त्यामुळे तो मुलामध्ये चांगलाच प्रसिद्ध झाला. मुलांच्या समस्या अडचणी याचा अभ्यास , आकलन व निराकरण करू लागला. त्यामुळे तो विद्यार्थ्यांचा प्रमुख म्हणून प्रसिद्ध झाला. विद्यालयातील मुलांमध्ये निवडणुकीची खेळ खेळू लागला. नाट्यमय रीतीने प्रबोधन करू लागला. त्यामुळे त्याला आजूबाजूचे लोक पण ओळखू लागले. आता त्याला खूप मान सन्मान होता. अभ्यासात पण हुशार होता. त्यामुळे त्याला मार्ग सोयीस्कर होत गेले.
आणि विशेष म्हणजे त्याला कष्ट, मेहनतचे फळ नक्की मिळते याचा साक्षात्कार झाला. आणि लक्षात आले की एकटं राहून कार्य करण्यापेक्षा आपल्या विचारसरणीचे संगठन जॉईन केले तर आपल्या सोबत लोक, संघटना असेल व आपले विचार कार्य लोकांसमोर प्रखरपणे मांडता येतील. त्याप्रमाणे त्याने लहानपणीच समाजहिताचे संगठन जॉईन केले व आपले कार्य करू उभी लागला. आता तो प्रसिद्ध झाला. मुलांच्या घोळक्यात राहू लागला.
पण आता घरच्यांना मात्र काळजी लागली असे जर केले आणि काही कायदेशीर कारवाई झाली तर याला नोकरी कशी लागणार? मग घरच्यांनी त्याला समजावले की आपण अतिशय सामान्य आहोत तू अशी कुठलीही कामे करू नकोस. फक्त शिक्षण कर आणि नोकरी कर. घरच्यांनी चांगलाच दम दिला. आता लक्ष्मण विचार करू लागला की घरच्यांचे पण खरे आहे. मग त्यांनी या कार्यासोबत अर्थार्जन कसे करता येईल यावर विचार करू लागला. त्याने विचार केला कि नोकरी केली तर मी चौकटीत बंदिस्त राहील. पैसा पण मोजकाच. मग त्यांनी भारत सरकारच्या स्टार्ट अप इंडिया याचा अभ्यास केला व एक स्टार्ट अप सुरू केले . त्यावेळी तो कॉलेजच्या तिसऱ्या वर्गात होता. आता त्याचे कार्य खूप वाढले .
कॉलेज, अभ्यास, संगठनकार्य , सामाजिककार्य, सभा आंदोलन ,उपोषण ई. कार्य व महत्वाचे म्हणजे स्टार्टअप. अश्या संपूर्ण व्यस्ततेत दिवस जाऊ लागला. आता स्टार्टअप मध्ये लक्ष देऊ लागला. दिवस रात्र मेहनत करून त्याला यश मिळू लागले. येथे त्याला त्याच्या संगठन व इतर कार्यामुळे झालेल्या ओळखीचा प्रचंड फायदा झाला. त्याच्या आधीच्या प्रसिद्धीमुळे त्याचे स्टार्टअप हे खूपच जोरात जोमाने सुरू झाले. पैसा यश मिळत होते
आता त्याला वेध लागले होते विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीचे. त्यांनी अर्ज भरला. झाले, प्रतिस्पर्धी उमेदवार व त्याचा गट, समूह याचा अभ्यास करून त्याला जिकावे, टक्कर द्यायची होती. आणि विद्यार्थ्यानी मत देण्यासाठी त्या विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्याची गरज होती. त्यांचे मन हे सकारात्मक असले तर मतदान होईल व विजय प्राप्त होईल. पण आता मत सकारात्मक याण्यासाठी काय करावे लागेल याचा अभ्यास आणि विचार करू लागला. आपल्या जवळच्या मित्रांची बैठक घेऊन यावर आकलन व सुयोग्य मार्ग यावर मंथन होऊ लागले. आणि मग प्रचार सुरू झाला. लक्ष्मणने आतापर्यंत केलेल्या कामांची यादी व बायोडाटा तयार केला. आणि तीन मुद्द्यांवर प्रसिद्धीपत्राद्वारे प्रकाशित आले ते म्हणजे भूतकाळातील कार्य, वर्तमानकाळातील कार्य व भविष्यामध्ये करणारे कार्य . विद्यार्थ्यांच्या प्रत्येक सूक्ष्म कार्याचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना आखण्यात आली. लक्ष्मणच्या असे लक्षात आले की विद्यार्थ्यांना पुढील बाबी अतिशय महत्वाच्या वाटतात त्या अश्या -- अभ्यास, नोकरी, परीक्षा, फीस, मित्रमंडळी, सर्व प्रकारच्या सोयी सुविधा, कॅन्टीन, गरीब होतकरू विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगार, मार्गदर्शन केंद्र. अश्या विविध योजनाच्या आधारे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्याचे वैयक्तिक समस्यांचे निवारण. अश्या प्रकारची सुयोग्य नियोजन करण्यात आले. पण याचा परिणाम काही स्तरावर सकारात्मक झाला. विरोधी पक्षाने लक्ष्मण बद्दल अपप्रचार सुरू केला. त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा मग याला उत्तर म्हणून काही नकारात्मक भूमिका,विचार करून जशास तसे उत्तर देण्यात आले आणि शेवटी अथक परिश्रमाने लक्ष्मण विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आला.
आयुष्यातील प्रथम सार्वजनिक निवडणूक लक्ष्मणने जिंकली. मोठया थाटात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आणि लक्ष्मण अत्यंत प्रसन्नतेने आनंदाने घरी आला. घरी आई, वडील,बंधू भगिनी वाट बघत होते. सर्वांनी त्याचे स्वागत केले. घरी गोडधोड भोजन केले.
काळ, वेळ, समय जात होता. गावातील पुढारीपण लक्ष्मणचे महत्व जाणून होते . महाविद्यालयात असे पर्यंत लक्ष्मणने विद्यार्थी प्रतिनिधी चे काम अत्यंत प्रामाणिकपणे केले. आणि तो एक उकृष्ठ विद्यार्थी म्हणून नावारूपास आला.
शिक्षण संपले
आता लक्ष्मणने "दाम" म्हणजे धन, संपत्ती, पैसा, यश कमवायचे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले. स्टार्टअप सुरू झालेलेच होते त्यातून उत्पन्न येतच होते पण नवी टेक्नॉलॉजी, मीडियाच्या माध्यमातून विस्तार, प्रसार,विक्री, खरेदी व विविध प्रकारच्या माध्यमातून उत्पन्न यावर लक्ष, ध्येय ठेवून आर्थिक स्थिरता प्राप्त केली. स्वतः चे घर, जमीन, आर्थिक गुंतवणूक, विविध प्रकारची गुंतवणूक आणि त्याबरोबर समाजकार्य, राजकारण करत भविष्य निर्वाह निधीचे संकलन करून व योग्य माणसांच्या, अधिकाऱ्यांच्या हातात कारभार सोपवून आता लक्ष्मण समजकारणात राजकारणात सक्रिय झाला. या सर्व कालावधीत त्याचे लग्न पण झाले आणि मुलेबाळे होऊन संसार पण सुखाचा सुरू झाला. संसाराचा उतार चढाव बघत त्यातून योग्य पर्याय नियोजन, आकलन करत जीवन जगत होता.
आतापर्यंतच्या जीवनाच्या प्रवासातून लक्ष्मणच्या असे लक्षात आले की साम, दाम तर आपण अवगत केले पण आता "दंड नीति आणि भेद नीति" याचा विचार आणि आकलन केले पाहिजे तर हे साध्य करण्याकरिता सत्ता पद व राजकीय गुरू हे अत्यावश्यक आहे.
म्हणून त्याने विभागातील श्रेष्ठ, ज्येष्ठ, जनमान्य राजकीय गुरू केले . राजकीय गुरू सोबत राहून त्यांनी दंड आणि भेद नीति चा अभ्यास केला . आणि काही मुद्दे त्याच्या लक्षात आले ते असे -
दंड म्हणजे – जेव्हा समजावून सांगून उपयोग होत नाही, तेव्हा शिक्षा देऊन वठणीवर आणणे. दंड म्हणजे शिक्षा देणे किंवा बळाचा वापर करणे.
जेव्हा कोणी आपलं म्हणणं ऐकत नाही, समजावलं तरी समजत नाही, पैसे किंवा भेटवस्तू दिल्या तरी तयार होत नाही –
तेव्हा शिस्त लावण्यासाठी किंवा मन वळवण्यासाठी शिक्षा केली जाते, धमकी दिली जाते, किंवा बळ वापरलं जातं – हाच उपाय म्हणजे दंड.
मग लक्ष्मण उदाहरणच्या स्वरूपात समजण्याचा प्रयत्न करू लागला.
जर एखादा शत्रू किंवा विरोधक साम आणि दामाने सुद्धा ऐकत नसेल, तर दंडाच्या माध्यमातून त्याला झुकवले जाते, उदा. सेनादल, शिक्षा, कारवाई, बलप्रयोग.
जर विद्यार्थी वारंवार चुका करत असेल तर शिक्षक त्याला समजावतात (साम), मग शिक्षा देण्याची धमकी देतात (दाम), तरी ऐकत नसेल तर शिक्षा (दंड) केली जाते.
दंड म्हणजे कोणत्या गोष्टी असू शकतात?
शासनाने दिलेले कायदेशीर दंड/शिक्षा
सेनाव्यवहार – युद्ध किंवा बलप्रयोग
कायदेशीर कारवाई – पोलिसांची कडक कारवाई
मनावर दबाव – अधिकार वापरून शिक्षा
आता लक्ष्मण च्या लक्षात आले की
"दंड" हा साम, दाम न चालल्यावर वापरण्यात येणारा एक कठोर पण परिणामकारक उपाय आहे. तो शिस्त राखण्यासाठी किंवा उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शक्तीचा वापर करतो.
लक्ष्मण स्वतः च्या मनात विचार करू लागला आणि मनातल्या मनात बोलू लागला "भेद नीती" म्हणजे फूट टाकून किंवा गोपनीयता वापरून विजय मिळवण्याची युक्ती.
सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर:
भेद नीती म्हणजे काय?
भेद म्हणजे गुप्त माहिती वापरणे, दुश्मनांमध्ये फूट पाडणे, किंवा एखाद्याचे गुपित उघड करून त्याचा फायदा घेणे.
भेद नीती म्हणजे दुसऱ्यांच्या मनात संशय, असंतोष किंवा फूट निर्माण करणे, जेणेकरून ते कमजोर होतील आणि आपल्याला यश मिळेल.
लक्ष्मण स्वतः विचारमंथन करून उदाहरण शोधू लागला.
दोन मित्रांमध्ये भांडण लावून, त्यांना एकमेकांपासून वेगळं करून स्वतः फायदा घेणे – ही भेद नीती आहे असे त्याच्या लक्षात आले.
चाणक्याने नंदराज्याचा मंत्री अमात्य राक्षस याच्या मनात राजावर अविश्वास निर्माण केला होता – हा भेद नीतीचा उत्कृष्ट वापर होता.
एखाद्या विरोधकाची गुप्त माहिती मिळवून, त्याच्याच लोकांमध्ये ती पसरवून त्याचा पक्ष कमजोर करणे – हाही भेद नीतीचा प्रकार आहे.
आणि मग भेद नीती कधी वापरली जाते?
जेव्हा साम (समजावणे), दाम (लोभ), दंड (शिक्षा) हे तीन उपाय अयशस्वी ठरतात.
किंवा जेव्हा शत्रू फार बलाढ्य असतो आणि थेट टक्कर देणं कठीण असतं, तेव्हा भेद नीती खूप प्रभावी ठरते.
अश्या प्रकारे सखोल अभ्यास करून अत्यंत प्रामाणिकपणे सक्रिय राजकारणात प्रवेश केला.
अश्याच एका संध्याकाळी ग्रंथवाचन करीत असताना लक्ष्मण विचार करु लागला कि कर्ण अतिशय दानशुर, सज्जन, चांगला गुहस्थ होता, द्रोणाचार्य अतिशय उत्तम शिक्षक होता, भीष्माचार्य अतिशय सन्माननीय बुद्धिमान, शक्तिमान गृहस्थ होता. पण पक्ष कौरवांचा होता. संगत सोबत, दुर्योधन, दुःशासन ,शकुनी यांची होती. आता हे लोक वाईट होते का ? सामान्य नागरिकांसाठी . तर उत्तर आहे, नाही . त्यांनी पण समाजासाठी लोकांसाठी कार्य केले पण त्याच्याजवळ अभिमान, क्रोध, लोभ, स्वार्थ हे अवगुण यांच्याकडे होते. आणि ते एकत्रित येऊन षड्यंत्र रचायचे . तसेच पांडव पण द्युत मध्ये स्वतः च्या पत्नीला धन म्हणून हरले. पण धर्म पांडवांच्या बाजूने होता. आता धर्म म्हणजे युधिष्ठिर नाही. धर्म म्हणजे नीतिमत्ता, विवेक, शिलता, नम्रता, सतशिलाता असल्यामुळे भगवान श्रीकृष्ण यांच्या बाजूने होते आणि श्रीकृष्ण जिथे तिथे विजय नक्कीच. तसेच राजकारणातील राजकीय पक्षांचे पण असेच असते. सगळीकडे कर्ण, द्रोणाचार्य, भीष्म, अर्जुन, युधिष्ठिर असतात. पण भगवान श्री कृष्ण फक्त एकाच पक्षाकडे असतो.
आणि शकुनी मामा पण एकाच पक्षाकडे असतो. म्हणून हे राजकीय युद्ध होत असते. आता कलियुगामध्ये कोण श्री कृष्ण आणि शकुनी मामा कसा ओळखायचा ?
जो प्रगतीची ,शांततेची ,पर्यावरणाची , सुरक्षतेची , आणि मुख्य म्हणजे मूलभूत गरजांची काळजी घेऊन व्यवस्था करील तो माणसातला देव . आणि कुटीर कारस्थाने, ,संहारक प्रवृत्तीला पाठिंबा, अघोरी, वाईट कर्म करणारे , व्यसन ,वाईट ,चुकीच्या मार्गाने धन ,अर्थ, कर्म करविनारे हे झाले आधुनिक शकुनी. मग प्रत्येकाने ओळखायचे आहे की कोण काय आहे?
महाभारत हे आजच्या राजकारणाला अतिशय व्यवस्थित बसते. राजकारणामध्ये महाभारतातील प्रत्येक पार्ट ,व्यक्तिरेखा आहे. आणि त्याचे सर्व समर्पक उत्तर हे भगवान श्री कृष्ण यांनी गीतेमध्ये सांगितले आहे. आता आपल्यला सुज्ञपणे सुयोग्य विचार करावा लागेल. आणि आपली पुढची रणनीती आखावी लागेल.
गावातील सहकारी बँक, नागरी सोसायटी , फळविक्री सोसायटी , दूध संघ सोसायटी , ग्रामीण बँक, शिक्षण मंडळ , सामाजिक संधा अश्या छोट्या मोठ्या संस्थांमधून निवडणुकीस उभा राहिला . काही ठिकाणी यश आले . पण काही ठिकाणी अपयश , निराशा .
मग लक्ष्मण विचार करू लागला की टाकलेले राजकीय गणित कुठे चुकले ? गावचा जर विचार केला तर मुख्य निवडणुकीचे मुध्दे म्हणजे मतदार संख्या, वय, गट, श्रीमंत, गरीब, मध्यम आर्थिक परिस्थीती, लोकांच्या मूलभूत गरजा व वैयक्तिक गरजा, ध्येय, उद्देश, संबंध, जातीनिहाय जनगणना व संख्या, नातेसंबंध, मित्र परिवार, सामाजिक कार्य व विकास, मदत, सहकार्य योजना व मुख्य म्हणजे गरज असतांना, नसतांना आर्थिक मदत इत्यादी आहेत. मग या सर्व मुद्द्यावर अभ्यास व चिंतन, मनन, संशोधन केले पाहिजे. आणि लक्ष्मणने याचा सविस्तर अभ्यास करून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीस उभा राहिला. गावातील एका छोट्या क्षेत्रात उभा होता. आणि लोकांना आवाहान आणि एक लेख प्रकशित केला,
"जागो मतदार, जागो", अन्यथा
मला आठवतं मी लहान असताना म्हणजे 1980 ते 1990 च्या दशकातील स्थिती होती . आमच्या गावाकडील परिसरामध्ये काही विशिष्ट लोकांची दादागिरी होती त्याचे कारण असे होते की ते संघटित होते आणि त्यामुळे त्याच्या मनाला जे येईल तसे ते वागायचे . आमच्या शेतकरी बंधूंच्या शेतामधील पीक कापून न्यायचे. भाजी पाला शेतकऱ्यां समोर घेऊन जायचे . आयाबहिनीची छेडछाडी करायचे आणि कोणी प्रत्युत्तर दिलं तर त्याला सर्व मिळून मारायचे. त्यामुळे अक्षरशः दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते . पोलिस,कायदा सर्व काही होते पण त्या लोकांना धाक नव्हता. खुले आम आततायी माजली होती. प्रत्येक जण हा चिंतेत ,धाकात ,असुरक्षित होता. त्यावेळेस एक चमत्कार झाला. जनसामन्याची एक संघटना एका देवमाणसाने सुरू केली . तो देवमाणूस मुंबईहून आला होता त्याने लोकांना संघटित केले व सर्व मिळून सामना, प्रत्युत्तर युद्ध कास करायचं ते शिकवले . आणि याचे फलस्वरुप ते लोक घाबरले व नंतर सुरळीत सुरक्षित जीवनमान सुरू झाले .
सांगण्याचा उद्देश की संघटित व्हा आणि संघर्ष करण्यापेक्षा योग्य व्यक्तीस मतदान करा.
मतदान नक्की करा. सलग सुटी आहे म्हणून फिरायला जाऊ नका. आज आपण जर शांतपणे,सुरक्षित आहोत ते फक्त आपल्या सैन्य ,पोलिस व सुरक्षा रक्षककांमुळे आणि आणि हे नियंत्रणात असतं सरकारच्या, म्हणून सरकार निवड अतिशय महत्वाची आहे. आज भारतामध्ये हजारो वर्षापासून चालत आलेली संस्कृती त्यामध्ये मग शारीरिक ,आर्थिक, मानसिक, आध्यात्मिक विकास व त्यासाठी लागणारी कर्म व त्याचे फलित हे आपल्याला शिकविलेले आहे. , सोळा संस्कार , चौदा विद्या ,दर्शन शास्त्र, पुराण ,उपनिषद , वेद यासारखे ग्रंथ जगविण्यास शिकवतात आणि ही धरोहर सुरक्षित जिवंत राहिली पाहिजे . योग शास्त्र ,आयुर्वेद ,गंधर्व वेद ,नाट्यशास्त्र , संगीत शास्त्र, कृषी शास्त्र, अर्थशास्त्र, या माध्यमातून जीवन जगण्याची कला शिकविणारी आमची संस्कृती सुरक्षित जिवंत राहिली पाहिजे . इतिहास साक्षी आहे आमचे नालंदा तक्षशिला येथील वाचनालय हे सहा महिने जळत होते. अगणित अशी ज्ञानाचा दिवा विझत होता. कोणीही संरक्षण करू शकले नाही. कारण शक्तिहीन होते. दृष्ट वाईट अंध लोकांनी हा झंझावात मांडला होता. आणि त्यातून कित्येक पिढ्यांचे फक्त नुकसान आणि नुकसानच झाले.
पूर्वी मंदिरांच्या भोवती सर्व अर्थव्यवस्था, राज्य व्यवस्था ,न्याय व्यवस्था ,आरोग्य व्यवस्था व जीवन सुखी समाधानी आनंदी राहण्यासाठीची सर्व व्यवस्था होती .
कालांतराने त्याचे स्वरूप बिघडले . पण खरे बघितले तर त्या काळी लोक बुद्धिमान, समृद्ध , सुखी समाधानी आनंदी आरोग्यदायी व आयुष्यवान होते . त्याचे कारण भारतीय ज्ञान परंपरा आणि संस्कृती.
आणि परत हे सांभाळायचे असेल तर आपली मूल्ये संस्कृती, पुरातन ज्ञान यासोबत पुरोगामी विचार व मॉडर्न जगाचा अभ्यासक असलेल्या उमेदवार व पक्षालाच मतदान करा. अन्यथा अपरिमित नुकसान,हनी होईल . याचे परिणाम फार बिकट होतील. आणि सगळीकडे अराजकता मांडेल या परिस्थितीवर माझे हे गीत अगदी योग्य जुळेल.
*गीत*
दिसे नभात ते लालसर ढग रक्ताचे !
सरसर पडतेय भुईवर ते रक्त पुण्याचे!!
त्या रक्तापायी भरून गेली वसुधेची घरदारे!
लाललाल चहुकडे शालू नेसाला धरणीने!!
पाप पिऊ लागला ते भरभर कंठी प्राण पुण्याचे!
सगळीकडे अनर्थ माजला दिस आले व्यभिचाराचे!!
त्या रक्ताची वापस झाली ती गेली गगनात!
वरून खाली पडू लागली ती गार रक्तपात!!
त्या भयानक रक्तपातीत अनेक बहुजन मेले!
अनेक पुण्यवान तळपत मेले पाप राज आले!!
अखेर रक्ताचा पूर आला मातला उत्क्रांत!
धरणीमाता कासावीस झाली बघूनी हा अंत!!
विचार करा ,योग्य व्यक्तीस मतदान करा.
मित्रमंडळी व सहकारी बोलाविले व बैठक घेतली त्यात वरील मुद्द्यांवर चर्चा झाली. कामाचे स्वरूप आणि योजना आखण्यात आली आणि बॅनर, पोस्टर, खर्च, हिशोब ठेवण्यासाठी माणूस, प्रचार नियोजन, आखणी, सल्लागार, माहितीदार म्हणजे गावातील माहिती देणारे, निमंत्रित मित्र आणि मतदारांशी प्रत्यक्ष भेट व त्याच्या समस्या निवारण व मदत अश्या प्रकारची सुयोग्य नियोजन व व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा व प्रसार माध्यमांचा उपयोग करून अतिशय उत्कृष्ट मताधिक्याने निवडून आले. आता सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू होती.
लक्ष्मणने निवडून आल्यावर एक नव्या पर्वाची सुरुवात केली. काळानुरूप बदल केले.
असेच एक दिवशी दुर्दैवी बातमी कळाली कि एका शेतकऱ्याचे कापणीस आलेले केळीचे घड अज्ञात व्यक्तींनी कापून नुकसान केले. त्याला अत्यत दुःख झाले. मनात विचारांची प्रचंड काहुराकाहुर निर्माण झाली. प्रचंड संताप ,तिरस्कार निर्माण झाला.
अश्या दुर्दैवी घटना घडतातच कश्या?
एक तर असे कृत्य करणारे लोक हे मानसिक विकृत, नाहीतर सुड भावनेने पेटलेले असतात. पिकाचे नुकसान करणे म्हणजे विकृती आहे. शेतकऱ्याचे सर्व श्रम ,कष्ट, पैसा ,वेळ वाया जातो.
शेतकऱ्याची सर्व प्रकारे शारीरिक आर्थिक मानसिक हानी होते. तर याला जबाबदार कोण?
तो विकृत मनुष्य का? सूड भावनेने पेटलेला तो राक्षस?
या लोकांना थोडा तरी देवाचा, पापाचा ,शासनाचा , सरकारचा धाक नाही का?
मग इथे सरकार काय करते? ग्रामपंचायत तलाठी, ग्रामसेवक, विविध कार्यकारी सोसायटी, पंचायत समिती, जिल्हापरिषद, कृषी उत्पन्न बाजारसमिती पोलिस, न्यायव्यवस्था, आमदार, खासदार, मंत्री यांचा थोडाही धाक शिल्लक राहिला नाही का? अश्या लोकांचा माज एवढा का वाढला? दुसऱ्याला दुःखी करून स्वतः आनंद घेणाऱ्या या राक्षसांना सजा कधी मिळणार का?विकृत कार्य करणाऱ्या लोकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण व्हायला पाहिजे. आपण सामान्य माणसांनी पण अश्या लोकांचं शोध घेऊन त्यांची माहिती सरकारपर्यंत पोहोचविली पाहिजे. पीक सुरक्षेसाठी सरकारी व्यवस्था तर आहेच पण लोकांनी एकत्र येऊन या करिता कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. म्हणून लक्ष्मणने एक पत्र लिहिले .
सामान्य नागरिकांचे पत्र
मा, सर्व समाज सेवक, राजकारणी, अधिकारी, सरपंच, पंचायत समिती सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष, जि. प. सभापती, आमदार, खासदार मंत्री व सर्व मान्यवर समजतील घटकांसाठी एक सामान्य शेतकऱ्याच्या मनातील लिहिलेले पत्र*
मा.
साहेब/ दादासाहेब/ भाऊसाहेब/ आबासाहेब/बापूसाहेब/ बाळासाहेब / राजेसाहेब/दांनविर/ शूरवीर/समजाविर/ सर / इतर सर्व राजमान्य, स्व मान्य , मान्यवर
यांच्या सेवेशी.
सर्व जण हिताय व सर्व जण सुखाय हि भावना व्यक्त करून काही माफक अपेक्षा करीत आहे.
राजकारणात, समाजकारणात आहेत याचा अर्थ समाज जागृती, प्रबोधन समाजकार्य विकास या भावनेने गावातील वंचित लोकांसाठी, गरीब, असहारा, वृध्द, अनाथ, अपंग, निराधार लोकांसाठी व त्यांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा देण्यासाठी, नागरिकांचा मानसिक, शारीरिक, अध्यात्मिक विकास करण्यासाठी. गाव हे कुटुंब व गावातील प्रत्येक व्यक्ती सभासद त्यांचा विकास करण्याची जबाबदारी प्रमुखाची. प्रत्येक नागरिक सुखी, समाधानी, शांती ऐश्वर्य समृध्दी पूर्वक जगण्याची जबाबदारी प्रमुखाची. न्याय, सुरक्षा,मूलभूत. सुविधांची जबाबदारी प्रमुखाची.
ग्रामविकास होण्यासाठी अपेक्षा पुढीप्रमाणे.
आदर्श ग्रामासाठी कार्य
१) मूलभूत सुविधां( अन्न सुरक्षा, वस्त्र,निवारा)
२)मूलभूत शिक्षणाची सुविधा
३)सार्वजनिक वाचनालय
४)मूलभूत आरोग्य सुविधा
५)सुंदर अत्याधुनिक सार्वजनिक बगीचा
६)शेती तक्रार व सल्ला, संशोधन कार्यालय
७)न्याय व तक्रार निवारण केंद्र
८) आत्मनिर्भर ग्राम केंद्र
९) योग, व्यायाम, खेळ सुविधा
१०)रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मदत केंद्र
११) रस्ते, लाईट, दुतर्फा झाडं, वृक्ष संवर्धन
१२)नागरिक मदत केंद्र
१३) कन्या व महिला सबलीकणासाठी कार्य
१४) गरीब, अशिक्षित,असहरा,अनाथ, वृध्द लोकांसाठी कार्य
१५) आपत्ती व्यवस्थापन व निवारण केंद्र.
१६)शेती पूरक व्यवसाय व इतर व्यवसाय प्रोत्साहन, संवर्धन व संरक्षण केंद्र
१७)साक्षरता केंद्र
१८) डिजिटल अवेयरनेस व मार्गदर्शन केंद्र
१९)शेतीभाव व इतर व्यवसाय हमी भाव
२०) हुशार विद्यार्थी, विशेष कार्य करणारी नागरिक प्रोत्साहन पुरस्कार
२१) संस्कार केंद्र
२२)भारतीय संविधान अभ्यास केंद्र
२३) अर्थवाढि करता योजना
२४)शेजारी गांव मित्र संवर्धन योजना
२५)ग्रामविकास वार्षिक प्लान
वरील कार्य आपण व आपले सहकारी पूर्ण करणारच हा विश्वास .
धन्यवाद.
अश्या प्रकारचे पत्रक देऊन सरपंचाना वेठिस धरले.
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास केला. सर्वांशी मिळून मिसळून, गोड बोलून कारभार केला. त्याच्या ह्या कुशलतेला बुघुन त्याला दोनच वर्षात सरपंच पदाची जबाबदारी दिली गेली. आता आपल्या गावची प्रगती, स्वच्छता, मूलभूत गरजा, शिक्षण, सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक विकास केला. आता संपूर्ण तालुका आणि जिल्हा स्तरावर लक्ष्मणचे नाव चर्चेत होते. आजू बाजूच्या गावाचे लोक त्याचा राजकीय सल्ला घेण्यासाठी येऊ लागले. आता लक्ष्मणने ठरविले की आता परिसराचा विकास, कायापालट करायचा. म्हणून आपल्या विचारसरणीत योग्य व कार्याला न्याय मिळवून देईल अश्या राजकीय पक्ष प्रवेश करायचा. मग त्याने खूप विचार मंथन केले आणि मित्रमंडळी, कार्यकर्ते, राजकीय गुरू यांचा सल्ला घेऊन एका राष्ट्रीय पक्षात प्रवेश केला.
आता पक्षात प्रवेश झाल्यामुळे एक सपोर्ट,दिशा, ध्येय, सल्लागार व बळ, शक्ती मिळाली.
आताखरे ज्ञानाचा, बुद्धीचा, निर्णय क्षमतेचा योग्य उपयोग होणार होता. भूतकाळातील केलेय यशस्वी कार्यामुळे लक्ष्मणला पंचायत समिती, जिल्हापरिषद सदस्य म्हणून तिकीट मिळाले आणि तो यशस्वीपणे विजयी झाला. आता तालुका जिल्हा स्तरावर विकास करू लागला. स्वच्छता, मूलभूत गरजा,पाणी, भुख,गरिबी, आर्थिक विकास महामंडळ स्थापना अश्या अनेक मुद्द्यांवर काम केले आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक स्थिरता निर्माण केली. जिल्यातील गावागावांमध्ये लक्ष्मणच्या कामाची चर्चा होऊ लागली. लोक सभेमध्ये, आपआपसात चर्चा करू लागले. आणि लक्ष्मण ला भावी आमदार म्हणून बघू लागले.
पक्षश्रेष्ठी पर्यंत लक्ष्मणच्या नावाची कार्याची महती गेली. पक्षश्रेष्ठींनी लक्ष्मणला मुख्य कार्यालयात बोलाविले आणि विधानसभेला म्हणजे आमदार पदाकरीता निवडणूक लढविण्याची घोषणा,परवानगी दिली.
आता लक्ष्मणच्या समोर एक उच्च ध्येय उद्देश होता. स्वतःचे
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभव, शिक्षण आणि मूल्ये यांचे आत्मपरीक्षण केले.
मोहिमेची यशस्वी आखणीसाठी स्थानिक राजकीय सल्लागार, निवडणूक तज्ज्ञ आणि कायदेशीर सल्लागारांची मदत घेणे उपयुक्त ठरेल असे जाणले व त्यांच्या मदतीने संपूर्ण सुरक्षित नियोजन तयार केले.
मतदारसंघाचा अभ्यास सखोल अभ्यास केला. मतदारसंघातील लोकसंख्या, समाजघटक, स्थानिक समस्या, आणि विकासाच्या गरजा समजून घेतल्या.
पूर्वीच्या निवडणूक निकालांचा अभ्यास केला. स्थानिक नेते, सामाजिक संस्था, आणि नागरिकांशी संवाद साधला. सभा आयोजित केल्या. प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. पत्रक प्रसिद्धीस दिले आणि ते लोकांपर्यत पोहोचवा अशी व्यवस्था केली. समाज मंदिर, धार्मिक, आध्यात्मिक विकास, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासासाठी निधी व्यवस्था केली. मूलभूत गरजा पाणी, शिक्षण, प्रवास,शेती, व्यापार, उद्योग याला चालना देण्यासाठी योजना आखली. संपूर्ण प्रदेश हा सुजलाम सुफलाम कसा होईल व रामराज्य कसे स्थापित होईल या दृष्टीने कार्य करण्याचे आश्वासन आणि वचन दिले.
निवडणूक आयोगाच्या नियमांची माहिती व आचारसंहितेचा अभ्यास केला.
भारत निवडणूक आयोगाच्या (ECI) अधिकृत संकेतस्थळावरून उमेदवारी अर्ज, खर्च मर्यादा याची माहिती मिळविली.
प्रचारमोहिमेची रणनीती आखणी- प्रभावी प्रचारासाठी सोशल मीडिया, स्थानिक सभा, आणि जनसंपर्क यांचा वापर केला. स्वतःचा संदेश, घोषणापत्र, आणि विकास आराखडा तयार केला. स्वयंसेवक, स्थानिक कार्यकर्ते, आणि समर्थकांची टीम तयार केली.
वित्तीय नियोजन आणि निधी संकलन-निवडणूक खर्चासाठी कायदेशीर मर्यादेत राहून निधी उभारणी केली. पारदर्शक आणि जबाबदार आर्थिक व्यवस्थापन सुनिश्चित केली.
तसेच प्रभावी जनसंपर्क आणि प्रचार-स्थानिक माध्यमे, वृत्तपत्रे, आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून संदेश लोकांपर्यंत पोहोचावीला.
जनतेच्या विविध प्रश्नांना ,समस्या अडचणीना उत्तर दिले आणि त्यांच्या समस्या समजून घेतल्या.
निवडणूक दिवस आणि मतमोजणीची तयारी केली. मतदान केंद्रांवर एजंट्सची नियुक्ती केली. मतदान प्रक्रियेचे निरीक्षण केले आणि कोणत्याही अनियमिततेची नोंद ठेवली. मतमोजणीच्या दिवशी कोणत्याही परिणामांची तयारी ठेवली. पण स्वतः वर परमेश्वराला विश्वास होता की मी नक्कीच विजयी होईल. आणि जनतेच्या आशीर्वादाने लक्ष्मण अतिशय जास्त मताधिक्याने निवडून आला.
Comments
Post a Comment