*प्राणायाम- एक वरदान*
डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे
@Do not copy without permission.all rights reserved.
प्राणायामाचे वर्गिकरण पृथ्वीतलावर प्राणायामाचा जन्म झाल्यापासून दत्तात्रय, पातंजल ,,घेरण्ड, शिव सहिता, गोरक्ष संहिता, स्वात्माराम इत्यादी ऋषींनी प्राणायामाची जगाला ओळख करून दिली .प्रत्येकाची प्राणायाम पद्धत दुसऱ्याशी कुठेतरी सूक्ष्म पातळीवर भिन्न आहे. त्यांचे ते प्राणायाम आणि त्याबाबतचे विचार हे थोडेसे अलग आहे. त्यांच्या प्राणायामाची मोडतोड करून शास्त्रोक्त प्राणायामाच्या नावाखाली आपलेच प्राणायाम कसे समाजाला उपयुक्त आहेत असे सांगण्याची कोणताही प्राणायाम तज्ञ हिंमत करू शकत नाही.
*पतंजली मुनींनी सांगितलेले प्राणायाम*.
प्राणायामाचे मूळ प्रकार व त्यांची व्याख्या पतंजलि ऋषींनी केलेली आहे व त्यावर व्यास मुनींनी भाष्य केले आहे. पतंजली नुसार प्राणायामाचे चार प्रकार आहेत .पहिला बाह्य वृत्ती प्राणायाम, दुसरा अभ्यंतर वृत्ती प्राणायाम, तिसरा स्तंभ वृत्ती प्राणायाम त्याच्यामध्ये अंतर कुंभक ,बाह्य कुंभक, केवल कुंभक आणि चौथा प्रकार आहे बाह्य अभ्यंतर विषय आक्षेप .
प्राणायाम हा शब्द सर्वप्रथम आपणास पतंजलीच्या अष्टांग योग आत मिळतो .अष्टांग योगा प्राणायाम ही चतुर्थ पायरी आहे. प्राणायामाची व्याख्या पतंजलि ऋषींनी खालील प्रमाणे केलेली आहे
*तस्मिन सती श्वास प्रश्वासोगर्ति विच्छेद: प्राणायाम!!*
प्राणायाम या शब्दाची फोड केली असता यात दोन शब्द येतात. पहिला प्राण व दुसरा आयाम प्रा म्हणजे शरीराला लागणाऱ्या पाच ऊर्जा व पाच प्रकारच्या उपऊर्जा .प्राण् या शब्दांची फोड केली असता त्यात प्र व आण असे दोन शब्द येतात. प्र म्हणजे विशेष आणि आण म्हणजे निरंतर चालणारी जीवन क्रिया होय. आण या शब्दाची फोड केली असता अ व वाण असे शब्द येतात याचा अर्थ ज्याच्या बद्दल निश्चित काही सांगता येत नाही असा होतो.
*याज्ञवल्क्य ऋषिंनी प्राण व अपान एक करणे याला प्राणायाम असे म्हटले आहे.*
*व्यास ऋषींनी उलटी झाल्याप्रमाणे वेगाने श्वास फेकणे व त्याला रोखणे म्हणजे प्राणायाम असे म्हटले आहे.* आणि *पतंजलि ऋषींनी श्वास व प्रवास यांची गती कमी करणे याला प्राणायाम असे म्हटले आहे.* आयाम या शब्दाचा अर्थ प्राणशक्तीचा विस्तार करणे व वापर करणे यालाच प्राणायाम असे म्हणतात.
प्राण शक्ती पंच ज्ञानेंद्रियांच्या कार्यासाठी लागते. प्राणायामातील श्वासा संबंधीच्या सज्ञा व क्रम
पूरक अभ्यांतर वृत्ती प्राणायाम म्हणजे संत हळूवार दीर्घ असा शरीराला झटका न देता घेतलेला श्वास .
आंतर कुंभक (स्तंभ वृत्ती प्राणायाम)- म्हणजे पूरक सज्ञेप्रमाणे घेतलेला श्वास आत रोखून ठेवणे.
रेचक (बाह्य वृत्ती प्राणायाम)- आत रोखून ठेवलेला श्वास कंठाशी आवाज करत व घशाशी हळुवारपणे स्पर्श करीत सोडणे. श्वास बाहेर सोडताना मूलाधार बंध लावावा व रिजका अंती हा बंध सेल सोडावा .
बाह्य कुंभक (स्तंभ वृत्ती प्राणायाम)- म्हणजे रेचकानंतर बाहेर सोडलेला श्वास बाहेरच रोखून ठेवणे.
बाह्य अभ्यंतर विषयाक्षेपी प्राणायाम म्हणजे एक श्वास घेऊन तो सोडुन द्यावा. त्यानंतर तो रोखावा. जेव्हा श्वास घेण्याची इच्छा होईल त्यावेळेस तो परत बाहेर सोडावा. या क्रिया क्षमतेप्रमाणे जितक्या वेळेस करता येईल तितके वेळेस कराव्यात. त्यानंतर श्वास घ्यावा व रोखून ठेवावा. जेव्हा श्वास सोडावा असे वाटेल त्या वेळेस तेथूनच पुन्हा वर श्वास घ्यावा. असे जितक्या वेळेस करता येईल जितक्या वेळेस करावे याप्रमाणे एक आवर्तन होईल अशी तीन ते एकवीस आवर्तने आपल्या क्षमतेनुसार करावेत प्राणायाम हा पूरक आंतर कुंभक रेचक कुंभक (4:2:5:2) या प्रमाणातच करावा.
*भगवान शंकरांनी सांगितलेले प्राणायाम*
हटयोग हा भगवान श्री शंकरांनी पार्वतीला सांगितलेला उपदेश आहे. त्यामध्ये पाच अध्याय असून ते पुढील प्रमाणे आहेत
आसंन विधी
प्राणायाम
मुद्रा
समाधी
औषध कथन इत्यादी
वज्रासनात बसून उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडी वर नंतरची दोन बोटे डोळ्यांच्या मध्यभागी व शेवटची दोन बोटे डाव्या नाकपुडीवर ठेवावीत .डाव्या नाकपुडीने श्वास आत घेतल्यावर तो आत धरता येईल तेवढा धरावा. नंतर उजव्या नाकपुडीने बाहेर सोडावा. उजव्या नाकपुडीतून श्वास घेऊन तो हात धरावा. नंतर डाव्या नाकपुडीतून श्वास बाहेर सोडावा व हे क्रमाक्रमाने डाव्या उजव्या बाजूने श्वास घेताना व सोडताना हळूवार करावे. याला नाडीशोधन, अनुलोम विलोम असे म्हटले जाते.
*भगवान दत्तात्रेय यांनी सांगितलेले प्राणायाम*
नाथ संप्रदायाची स्थापना भगवान श्री शंकरांनी केली व गुरूपदेश देण्यासाठी दत्तात्रेयांना सांगितले. त्यामुळे नाथ संप्रदायाची गुरु-शिष्य परंपरा ही दत्तात्रयां पर्यंत पोहोचते. त्यांनी सांगितलेले प्राणायामाचे प्रकार खालील प्रमाणे आहेत .
१)विभागीय प्राणायाम
२) मुद्रा प्राणायाम
३)महद प्राणायाम
विभागीय प्राणायाम मध्ये कनिष्ठ मध्यम व जेष्ठ असे प्रकार आहेत
मुद्रा प्राणायामाचे पाच प्रकार असून ते पुढील प्रमाणे चीन्मुद्रा, चिन्मय मुद्रा आदीमुद्रा ,मेरुदंडमुद्रा, पूर्णमुद्रा, महंदप्राणायामात वज्रासन, तीन प्रकारचे बंध पूर्ण मुद्रा व प्राणायाम यांचा अंतर्भाव होतो.
*घेरंड संहितेत सांगितलेले प्राणायाम*
घेरंड संहितेत षटकर्मामुळे शोधन अर्थात शुद्धी होते .
आसनांमुळे मजबुती येते.
मुद्रा मुळे स्थिरता येते.
प्रत्याहरा ने धैर्य येते.
प्राणायामाने हलकेपणा येतो. ध्यानामुळे इच्छिलेले ही गोष्ट प्रत्यक्षात होते
व समाधीमुळे निर्लिप्तपणा येतो व मनुष्य मुक्त होतो यात शंका नाही. धौती ,बस्ती, नेती ,लौलीकी ,त्राटक व कपालभाती या सहा क्रीया योग्याने कराव्यात.
*प्राणायाम - श्रीमद्भागवत पुराण*
श्रीमद्भागवत पुराणं (अध्याय अकरावा, श्लोक 32 ते ३५) मध्ये उद्धवाने विचारले हे कमलनयना ,माणसांनी आपल्या कोणत्या स्वरूपाचे कसे ध्यान करावे? हे आपण मला सांगावे श्री भगवान श्रीकृष्ण म्हणाले : फार उंच किंवा फार खोल असलेल्या सपाट आसनावर शरीर ताठ ठेवून आरामात बसावे .हात मांडीवर ठेवावेत आणि दृष्टी नाथाच्या अग्रभागी लावावी. यानंतर पूरक कुंभक आणि रेचक या क्रमाने प्राणायामाने नाडीशोधन करावे. हे एकदा डाव्या नाकपुडीने एकदा उजव्या नाकपुडीने ही करता येईल हा अभ्यास हळूहळू वाढवावा त्याच बरोबर इंद्रियांवर ताबा ठेवावा.
मूलाधारात उत्पन्न झालेला ओमकार प्राणवायूच्या साह्याने मस्तकापर्यंत न्यावा. कमळातील बीस तंतू प्रमाणे तो अखंड असून त्याचा नाद घंटानाद का प्रमाणे आहे असे मनात चिंतन करावे. अशा रीतीने दररोज तीन वेळा प्रत्येकी प्रत्येक वेळी दहा वेळा ओमकारा सहित प्राणायामाचा अभ्यास करावा. असे केल्याने एक महिन्याच्या आतच प्राणवायू वश होतो.
*प्राणायाम महत्व -उमा संहिता 27 वा अध्याय*
प्राणवायू ला नियंत्रित करून तीन वेळा गायत्री मंत्र दोन्ही भुवयांच्या मध्ये ध्यान करून जप करणे याला प्राणायाम म्हटले आहे. जो मनुष्य प्रातःकाली लवकर उठून प्राणायाम करतो त्याचे सर्व पापे नष्ट होऊन तो ब्रह्म लोकाला प्राप्त होतो. आळस सोडून एकांतात सुखासनात बसून चंद्र व सूर्य म्हणजे डावे आणि उजवे नेत्र यांच्या क्रांतीमुळे प्रकाशित झालेला भूमध्य भाग जो ज्यात अग्निचं तेज प्रकाशित आहे त्या ठिकाणी चिंतन करून ध्यान करावे.
Comments
Post a Comment