Posts

Showing posts from September, 2025
 मायासुर – भारतीय ज्ञानपरंपरेतील अभियंता लेखक - डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे  ठिकाण - राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे  संवाद - शिक्षक व विद्यार्थी  मुलांनो,  दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिवस म्हणून का साजरा केला जातो? उत्तर -  कारण या दिवशी भारत रत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (M. Visvesvaraya) यांचा जन्मदिन आहे.  शिक्षक - आजच्या या पवित्र दिवशी मी तुम्हा भारतीय ज्ञान परंपरेतील एक अभियंता मयासुर / मायासुर याच्या बद्दल माहिती सांगणार आहे .  शिक्षक व्याख्यान -  भारतीय पुराणकथांमध्ये मायासुर हा असुरांचा वास्तुशिल्पज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने वास्तुशास्त्र, शिल्पकला, यंत्रविद्या आणि नगररचना यामध्ये अप्रतिम कौशल्य प्राप्त केले होते. आजच्या भाषेत सांगायचे झाले तर तो एक तंत्रज्ञ अभियंता व नगररचनाकार होता. अभियंता म्हणून  त्याचे योगदान हे अविस्मरणीय आहे  त्याने  इंद्रप्रस्थ येथे पांडवांसाठी त्याने बांधलेली मायासभा ही अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना मानली जाते. तिच्यात प्रकाश, ध्वनी, आरसे, पाणी व जमिनीचे विलक्षण ...
 चहा - दर्शन ( philosophy) - *आजचा गमतीदार विषय*  डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे  ( कृपया हे माझे वैयक्तिक मत आहे) चहा पिणे ही अत्यंत सामान्य व साधारण बाब आहे पण यामध्ये गमतीदार भाग म्हणजे चहा पिणारे आणि पाजनाऱ्यांचे प्रकार व त्यांचे स्वभाव विशेष पुढील प्रमाणे - १) मीटिंग किंवा सभे मध्ये चहाच्या कपावरून अधिकारी आणि सामान्य कर्मचारी लक्षात येते. अधिकाऱ्याला विशेष स्वतंत्र कप व सामान्य कर्मचारीला साधे प्लास्टिक ,कागदाचे कप हा फरक. २) मीटिंग मध्ये बसलेल्या काही विशिष्ट लोकांना चहा देणे यावरून असे ओळख्याचे की ते अधिकारी हलकट आहेत आणि वाटप करणारे निकृष्ट दर्जाचे फक्त भंगार वर्गिकरणाचे आहे . ३) अतिथी म्हणून गेल्यावर चहा जर उत्तम असेल तर ती व्यक्ती महत्वाची असून गृहिणी ही उच्च विचार श्रेणीची आहे . ४) अतिथी म्हणून गेल्यावर चहा जर मध्यम असेल तर ती व्यक्ती सामान्य ,मध्यम असून गृहिणी ही राजकीय विचार श्रेणीची आहे म्हणजे ती असा विचार करते की मी चहा देऊन आदरसत्करही करते व यातच माझे पैसे वाचाविते म्हणजे दोन्ही खुश. ५) अतिथी म्हणून गेल्यावर चहा जर निकृष्ट दर्जाचा असेल तर ती व्यक्ती ...
 *शिक्षक व विद्यार्थी मूल्यांकन* *सत्यता की दांभिकता?* डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे  संध्याकाळची वेळ होती. कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये मित्रांसोबत गप्पा मारत बसलो होतो. शिक्षक असल्यामुळे साहजिकच शिकणे ,शिकविणे यावर चर्चा होत होती. त्यामध्ये विद्यार्थी मूल्यांकन हा महत्वाचा मुद्दा समोर आला. प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे होते. १) उत्तम मांडणी सध्या सरळ भाषेत समजावून सांगणे  २) अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करून शिकविणे व नोट्स उपलब्ध करून देणे  ३)शिक्षक म्हणून वर्गात शिकविण्याच्या पद्धती प्रभावी आणि विद्यार्थ्यांच्या विकासास पूरक असाव्यात. ४) विद्यार्थी-केंद्रित अध्यापन असायला पाहिजे . (Student-Centered Teaching) ५)विद्यार्थ्यांच्या गरजा, गती, आणि आवडीनुसार अध्यापन करायला पाहिजे . ६);प्रश्नोत्तरे, चर्चासत्रे, आणि गटकाम यांचा समावेश करायला पाहिजे. ६)विद्यार्थ्यांना विचार करण्यास आणि उत्तर शोधण्यास प्रवृत्त करायाला पाहिजे. ७) उदाहरणांद्वारे शिकवायला पाहिजे . (Teaching through Examples) प्रत्यक्ष उदाहरणे, गोष्टी, किंवा दैनंदिन जीवनातील संदर्भ वापरून विषय समजावून सांगणे यामुळे...
 NIRF म्हणजे काय? उद्देश योग्य दिशा मार्गदर्शक  लेखक - डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे  NIRF म्हणजे (National Institutional Ranking Framework). ही भारत सरकारच्या *शिक्षण मंत्रालयाची* एक योजना आहे, ज्याद्वारे दरवर्षी भारतातील उच्च शिक्षण संस्थांची गुणवत्ता आणि कामगिरीवर आधारित *रँकिंग (क्रमवारी)* दिली जाते.  *NIRF रँकिंगचे प्रमुख गट (Categories):* NIRF वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रांसाठी रँकिंग देते: 1. एकूण (Overall) 2. विद्यापीठ (University) 3. अभियांत्रिकी (Engineering) 4. व्यवस्थापन (Management) 5. औषधनिर्माण (Pharmacy) 6. कायदा (Law) 7. वैद्यकीय (Medical) 8. आर्किटेक्चर (Architecture) 9. डेंटल (Dental) 10. कृषी आणि संलग्न क्षेत्र (Agriculture & Allied Sectors) 11. संशोधन (Research) 12. नवोन्मेष (Innovation) NIRF रँकिंगसाठी वापरले जाणारे *पाच मुख्य निकष (Parameters)* 1. *अध्यापन, शिक्षण आणि संसाधने (Teaching, Learning & Resources – TLR) – 30%* शिक्षकांची गुणवत्ता व संख्या व शिक्षकाची गुणवत्ता ही त्याचा अनुभव व उच्च शिक्षण म्हणजे PhD डिग्री आणि नंतर त्याने केले...