चहा - दर्शन ( philosophy) - *आजचा गमतीदार विषय*
डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे
( कृपया हे माझे वैयक्तिक मत आहे)
चहा पिणे ही अत्यंत सामान्य व साधारण बाब आहे पण यामध्ये गमतीदार भाग म्हणजे चहा पिणारे आणि पाजनाऱ्यांचे प्रकार व त्यांचे स्वभाव विशेष पुढील प्रमाणे -
१) मीटिंग किंवा सभे मध्ये चहाच्या कपावरून अधिकारी आणि सामान्य कर्मचारी लक्षात येते. अधिकाऱ्याला विशेष स्वतंत्र कप व सामान्य कर्मचारीला साधे प्लास्टिक ,कागदाचे कप हा फरक.
२) मीटिंग मध्ये बसलेल्या काही विशिष्ट लोकांना चहा देणे यावरून असे ओळख्याचे की ते अधिकारी हलकट आहेत आणि वाटप करणारे निकृष्ट दर्जाचे फक्त भंगार वर्गिकरणाचे आहे .
३) अतिथी म्हणून गेल्यावर चहा जर उत्तम असेल तर ती व्यक्ती महत्वाची असून गृहिणी ही उच्च विचार श्रेणीची आहे .
४) अतिथी म्हणून गेल्यावर चहा जर मध्यम असेल तर ती व्यक्ती सामान्य ,मध्यम असून गृहिणी ही राजकीय विचार श्रेणीची आहे म्हणजे ती असा विचार करते की मी चहा देऊन आदरसत्करही करते व यातच माझे पैसे वाचाविते म्हणजे दोन्ही खुश.
५) अतिथी म्हणून गेल्यावर चहा जर निकृष्ट दर्जाचा असेल तर ती व्यक्ती न बोलविता किंवा गरीब असून गृहिणी ही हलक्या विचार श्रेणीची आहे.
६) मित्र सोबत असताना सर्वांना चहा पाजीत असल्यास तो मित्र उदार मनाचा आहे
७) मित्र सोबत असताना फक्त स्वतः करिता चहा घेत असेल तर तो स्वकेंद्र निर्मित आहे असे समजावे
८) चहा हा अतिशय चव घेऊन पित असेल तर तो चहाचा दर्दी आहे असे समजावे
९) चहा ही वारंवार पित असेल तर तो मनुष्य चहाचा व्यसनी आहे असे समजावे.
१०) चहा पिल्यानंतर कपात चहा शिल्लक ठेवत असेल तर तो मनुष्य कन्फ्युज आहे असे समजावे.
११) *चहाला चला म्हणून आग्रह करणारे व पैसा देण्याच्या वेळेस बाहेर निघून जाणारे म्हणजे कधीच बिल न देणारे हे लोक हलकट वर्गीकरणात येतात.*
१२) एका कपामध्ये दोन कप करणारे व कटींग कपात चहा पिणारे हे लोक कंजूस या वर्गीकरणात येतात.
१३) चहाला निमित्त शोधणारे उधळपट्टी करणारे या वर्गीकरणात येतात.
१४) चहा चा प्रयोग म्हणजे आल्याचा, पुदिण्याचा , इलायचीचा , चॉकलेट , बबल चहा पिणारे लोक हे संशोधक वर्गीकरणात येतात.
१५)घरी आल्यावर चहा न देता किंवा विचारपूस न करता अतिथीला पाठविणारे लोक हे बेशरम वर्गीकरणात येतात.
१६) घरी आल्यावर अर्धा कप देणारे हे अर्धवट वर्गीकरणात येतात
१७) घरी आल्यावर चहा घेणार का ? असे विचारणारे हे शहरी या वर्गीकरणात येतात .
१८) घरी आल्यावर चहा करिता आग्रह करणारे हे ग्रामीण संस्कारी वर्गीकरणात येतात
१९) घरी आल्यावर चहा न सांगता देणारे हे उदार वादी वर्गीकरणात येतात.
२०) घरी आल्यावर चहा देऊन चहा किती महाग झाला असे उच्चारण करणारे लोक हे नीच वर्गिकरणत येतात.
Comments
Post a Comment