NIRF म्हणजे काय? उद्देश योग्य दिशा मार्गदर्शक
लेखक - डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे
NIRF म्हणजे (National Institutional Ranking Framework). ही भारत सरकारच्या *शिक्षण मंत्रालयाची* एक योजना आहे, ज्याद्वारे दरवर्षी भारतातील उच्च शिक्षण संस्थांची गुणवत्ता आणि कामगिरीवर आधारित *रँकिंग (क्रमवारी)* दिली जाते.
*NIRF रँकिंगचे प्रमुख गट (Categories):*
NIRF वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रांसाठी रँकिंग देते:
1. एकूण (Overall)
2. विद्यापीठ (University)
3. अभियांत्रिकी (Engineering)
4. व्यवस्थापन (Management)
5. औषधनिर्माण (Pharmacy)
6. कायदा (Law)
7. वैद्यकीय (Medical)
8. आर्किटेक्चर (Architecture)
9. डेंटल (Dental)
10. कृषी आणि संलग्न क्षेत्र (Agriculture & Allied Sectors)
11. संशोधन (Research)
12. नवोन्मेष (Innovation)
NIRF रँकिंगसाठी वापरले जाणारे *पाच मुख्य निकष (Parameters)*
1. *अध्यापन, शिक्षण आणि संसाधने (Teaching, Learning & Resources – TLR) – 30%*
शिक्षकांची गुणवत्ता व संख्या व शिक्षकाची गुणवत्ता ही त्याचा अनुभव व उच्च शिक्षण म्हणजे PhD डिग्री आणि नंतर त्याने केलेले कार्य व त्याच्या मार्गदर्शनाखाली किती विद्यार्थी phd झाले. शिक्षक गुणवत्तेसाठी केलेले ट्रेनिंग वर्कशॉप्स, कॉन्फरन्स, एफ डी पी ई. शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर योग्य असले तर विद्यार्थी शिक्षक मूल्यांकन व्यवस्थित होते.
विद्यार्थ्यांना उपलब्ध सोयीसुविधा (लॅब, लायब्ररी, ICT सुविधा) तसेच मान्यताप्राप्त अभ्यासक्रम आणि शैक्षणिक प्रक्रिया.
यावरून संस्थेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सुविधा कितपत दिल्या जातात हे ठरते. बऱ्याच संस्थांमध्ये फक्त नावाला किंवा दाखविण्यासाठी सुविधा असतात . शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना लॅब व इतर अभ्यासक्रमाचे पूर्णपणे ज्ञान असणे आवश्यक आहे.त्याकरिता वेळोवेळी त्याचे ट्रेनिग हे आवश्यक आहे
2. *संशोधन व व्यावसायिक कार्य (Research & Professional Practice – RP) – 30%*
संशोधन लेख, पुस्तके, प्रकल्प व पेटंट्स. याच्यामध्ये पण क्वालिटी रिसर्च पेपर पब्लिकेशन , उदा. Q१,Q२ ई. पुस्तके पण उत्तम पब्लिकेशन चे व्हायला पाहिजे. आणि पेटंट चां विचार केला तर तर पेटंट ॲप्लिकेशन नंतर पब्लिकेशन नंतर ग्रांट नंतर मार्केट मध्ये प्रॉडक्ट स्वरूपात उपलब्ध. आणि याच्यानंतर इंडस्ट्री ई. अश्या स्वरूपाचं कार्य हे अपेक्षित असते.
उद्योग व संशोधन संस्थांसोबतची भागीदारी याचा अर्थ की या संस्थेसोबत करार करून संशोधन, शिक्षण ,ज्ञान अदलाबदली , व अनेक कार्यक्रम करून शिक्षक व विद्यार्थी मूल्यांकन वाढण्यास मदत होते.
मिळालेल्या संशोधन निधीचे प्रमाण हे महत्वाचे असते याचा अर्थ शिक्षक व मिळालेला निधी व प्रोजेक्ट याचे प्रमाण कसे आहे यावरून शिक्षकाची क्वालिटी व संशोधन प्रवृत्ती दिसून येते. Ph.D. विद्यार्थ्यांची संख्या व संशोधनाचे योगदान हा पण महत्त्वाचा घटक आहे . संशोधन हे outcome आधारित व्हायला पाहिजे. समाजासाठी देशासाठी, इंडस्ट्री साठी व पर्यायाने सर्व मानव व सर्वांसाठी उपयोगी असे संशोधन व्ह्यायला पाहिजे हे अपेक्षित आहे.
यावरून संस्थेचा *संशोधनाचा दर्जा आणि ज्ञाननिर्मितीची क्षमता* दिसते.
3. *पदवी प्राप्तीचे परिणाम (Graduation Outcomes – GO) – 20%*
विद्यार्थ्यांचे निकाल टक्केवारी उत्तम याचा अर्थ विद्यार्थि व शिक्षक यांच्या अथक प्रयत्नांमुळे उत्तम यश प्राप्त झाले आहे. आणि यावरच त्यांच्या कौशल्य ,ज्ञान , व विकास या आधारावर प्लेसमेंट (नोकरी) मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे मेहनतीचे फळ.
तसेच उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे उत्तम पाहिजे, व्यावसायिक परीक्षांमधील यश (जसे GATE, NET, UPSC इ.)
यावरून संस्थेचे *विद्यार्थ्यांना घडवण्याचे परिणाम* दिसतात.
4. *समावेश व पोहोच (Outreach & Inclusivity – OI) – 10%*
कर्तव्य जाणीव ठेवून वेगवेगळ्या सामाजिक व आर्थिक स्तरातील विद्यार्थ्यांचा सहभाग हा अतिशय महत्वाचा असतो.त्याच प्रमाणे महिला विद्यार्थी-शिक्षकांचे प्रमाण व प्रादेशिक व भौगोलिक विविधता (राज्याबाहेर/विदेशी विद्यार्थी). दिव्यांग, अपंग विद्यार्थ्यांसाठी सुविधा
यावरून *समाजातील सर्व घटकांसाठी संस्थेची उपलब्धता व समान संधी* दाखवतो.
5. *प्रतिमा / जनमानसातील प्रतिष्ठा (Perception – PR) – 10%*
यामध्ये उद्योग, नियोक्ते, संशोधन संस्था व समाजात संस्थेची प्रतिष्ठा यांचे मूल्यांकन होण्यासाठी व राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओळख व माजी विद्यार्थ्यांचा (Alumni) प्रभाव मोजण्यासाठी वरील काही मान्यवरांना एक फीडबॅक फॉर्म भरण्यासाठी पाठविला जातो . आणि त्यावरून *संस्थेची बाहेरच्या जगातली प्रतिमा* दिसून येते.
वरील सर्व मुद्द्यांवरून संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनक्षमता, समाजातील योगदान आणि प्रतिष्ठा यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करतात.
NIRF ranking कमी होण्याची कारणं अनेक आहेत त्यामध्ये प्रमुख कारण -
गुणवत्ता धारक शिक्षक कमी - गुणवत्ता धारक म्हणजे असा शिक्षक की त्याचे PhD पूर्ण झालेली आहे तसेच तो phd मार्गदर्शक आहे तसेच उत्तम प्रकारे संशोधन करीत आहे आणि त्या संशोधनाच्या माध्यमातून उत्तम क्वालिटी रिसर्च पेपर published करत आहे. आणि त्या बरोबरच त्याच्यामध्यामातून पेटंट आणि कॉपी राईट करीत आहे. आणि त्या अनुभवातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करीत आहे. आणि एक उत्तम विद्यार्थी घडवीत आहे. आणि याचेच outcome म्हणून विद्यार्थी हे उच्च शिक्षण व उच्च पदस्थ अधिकारी किंवा उच्च नोकरी , व्यावसायिक होत आहेत. आणि हे बघून प्परराज्यातील विद्यार्थी संख्या पण वाढत आहे .आणि गुणवान मुलींची संख्या वाढत आहे.हे सर्व फक्त गुणवान शिक्षकावर आधारित आहे.
पण गुणवान ,निष्ठावान शिक्षक कसा येईल? हे सरकार पुढे अतिशय आव्हान आहे.
शिक्षक कायमस्वरूपी भरती शिवाय दुसरा पर्याय नाही.
वरील गुणवत्तेचा संबंध हा सरळ industry आणि व्यवसायाशी आहे. सारांश असा की आर्थिक विकास,सामाजिक ,राजकीय सांस्कृतिक विकास जर खरंच सरकारला हवा असेल तर शिक्षक भरती अनिवार्य आहे.
सांगण्याच उद्देश शिक्षक आणि सर्व क्षेत्र याचा सरळ संबंध आहे. जर हे गणित चुकले तर भविष्यात काय होईल याचा विचार सांगणे एवढा अज्ञानी मी नाही!
Comments
Post a Comment