*शिक्षक व विद्यार्थी मूल्यांकन* *सत्यता की दांभिकता?*


डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे 


संध्याकाळची वेळ होती. कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये मित्रांसोबत गप्पा मारत बसलो होतो. शिक्षक असल्यामुळे साहजिकच शिकणे ,शिकविणे यावर चर्चा होत होती. त्यामध्ये विद्यार्थी मूल्यांकन हा महत्वाचा मुद्दा समोर आला. प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे होते.

१) उत्तम मांडणी सध्या सरळ भाषेत समजावून सांगणे 

२) अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करून शिकविणे व नोट्स उपलब्ध करून देणे 

३)शिक्षक म्हणून वर्गात शिकविण्याच्या पद्धती प्रभावी आणि विद्यार्थ्यांच्या विकासास पूरक असाव्यात.

४) विद्यार्थी-केंद्रित अध्यापन असायला पाहिजे . (Student-Centered Teaching)

५)विद्यार्थ्यांच्या गरजा, गती, आणि आवडीनुसार अध्यापन करायला पाहिजे .

६);प्रश्नोत्तरे, चर्चासत्रे, आणि गटकाम यांचा समावेश करायला पाहिजे.

६)विद्यार्थ्यांना विचार करण्यास आणि उत्तर शोधण्यास प्रवृत्त करायाला पाहिजे.

७) उदाहरणांद्वारे शिकवायला पाहिजे . (Teaching through Examples)

प्रत्यक्ष उदाहरणे, गोष्टी, किंवा दैनंदिन जीवनातील संदर्भ वापरून विषय समजावून सांगणे यामुळे विद्यार्थ्यांना विषयाशी संबंध जोडणे सोपे जाते.

८) दृश्य आणि श्राव्य साधनांचा वापर करायला पाहिजे .(Use of Visual and Audio Aids) चित्रफिती, पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन्स, व्हिडीओज, नकाशे, आकृती, पोस्टर्स इ. वापर. यातून ध्यान केंद्रित होते आणि शिकण्याची रुची वाढते.

९) सक्रिय सहभाग (Active Participation)विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला, विचार मांडायला, आणि चर्चेत सहभागी व्हायला उद्युक्त करायला पाहिजे.

"Think-Pair-Share", "Role Play", "Debate" इ. तंत्र वापरता येतात.

१०) विद्यार्थ्यांना गटांमध्ये काम करताना शिकण्यास संधी द्यायला पाहिजे. सहशिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अधिक चांगले समजते.

११)नियमित चाचण्या, प्रश्नमंजुषा, किंवा छोटे प्रकल्प घेऊन योग्य त्या सूचना आणि कौतुक द्यायला पाहिजे.

१२) प्रेरणा (Motivation) सकारात्मक विचार, प्रोत्साहन, आणि विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करायाला पाहिजे यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि शिकण्याची इच्छा टिकून राहते.

१३)विविध अध्यापनशैलींचा समावेश करायला पाहिजे (Use of Multiple Teaching Styles):दृश्य (visual), श्राव्य (auditory), आणि स्पर्शप्रधान (kinesthetic) शैलींचा वापर करून विविध प्रकारचे विद्यार्थी लक्षात येतात.

१४) प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान

विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास उद्युक्त करायला पाहिजे. त्यांचे शंका समाधान त्वरित आणि सुस्पष्टपणे करायला पाहिजे 

१५) सकारात्मक वातावरण ,भयमुक्त, आनंददायी आणि संवादात्मक वातावरण ठेवायाला पाहिजे . १६) शिक्षक-विद्यार्थी संबंध मैत्रीपूर्ण असायाला पाहिजे .


*वरील सर्व पद्धती उत्तम शिकविण्यासाठी मान्य आहे* . 

पण विद्यार्थ्याचे काय? विद्यार्थी नियमित कॉलेज ला येतो का नाही? वर्गात लक्ष देऊन ग्रहण, मनन, चिंतन करतो का नाही? का फक्त हजेरी साठी कॉलेजला येतो. वर्गामध्ये विद्यार्थ्यांचे वर्तणूक कशी असते? वर्तणूकही त्यांच्या संस्करावर अवलंबून असते. कठोर शिस्तीचे पालन करणाऱ्या शिक्षकाविषयी मत कसे असते? वर्गात काहीच न शिकवीत फक्त गोड बोलून व मैत्रीपूर्ण संबंध ठेवून विद्यार्थ्यांमध्ये बदल होतो का? विद्यार्थ्यांना खाऊ घालून ,आर्थिक मदत करून किंवा फायदा करून देऊन विद्यार्थ्यांची मानसिकता बदलता येते का? लायकी क्षमता नसताना फक्त मार्क्स उधळून विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होता येते का? 

आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे जे विद्यार्थी कॉलेज मध्ये फक्त टाईमपास किंवा गंमत म्हणून येत असतील किंवा पालकांच्या धाकाने ईच्छा नसताना कॉलेज मध्ये येत असतील आणि अभियांत्रिकी शिक्षणाकरिता जे आधी ज्ञान शिक्षण असते म्हणजे prerequisite विषय जर तयार नसतील तर त्यांना वर्गात समजणार कसे? 

शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्याला जर माध्यमिक उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण ज्ञान नसेल तर ? 


मान्य आहे की शिक्षकाचे शिकविण्याचे मूल्यांकन हे त्याच्या वर्गातील विद्यार्थ्यांना किती समजले यावरच व्हायला पाहिजे . पण यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत अटी विद्यार्थ्यांच्या आहे का? प्रवेश परीक्षेला अत्यंत कमी मार्क मिळून प्रवेश घेतला असेल तर त्या विद्यार्थ्याने आतापर्यंतची शिक्षणासाठी घेतलेली मेहनत कळून येते. जर अभियांत्रिकी वैद्यकीय शिक्षण हे मूलभूत ज्ञान नसलेल्या विद्यार्थ्या कडून फक्त नोकरी आणि कॉलेज वाचविण्याच्या उद्देशाने जर होत असेल तर आपले व आपल्या देशाचं भविष्य काय? 

याचाच अर्थ शिक्षक व विद्यार्थी दोन्हीही शिकविण्यासाठी व शिकण्यासाठी सक्षम पाहिजे तरच दोघांचे मूल्यांकन योग्य पद्धतीने होऊ शकते. 

धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

माझा अविस्मरणीय कुंभमेळा प्रयाग राज अनुभव*

*हुंडा बळी- समाजाला लागलेली कीड व सरकारची विफलता*

जर जीवनच नसेल तर कसले कार्य आणि काय?