*मतदान - एक पूण्यकर्म
*मतदान - एक पूण्यकर्म* *चुकीचा निर्णय भविष्याशी खेळ*  *डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे* ( सदरहू लेखातील विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार असून याचा विपरीत अर्थ लावू नये यामागे फक्तं एकच हेतू उद्देश आहे की सर्वांनी योग्य व्यक्तीला मतदान करावं व भविष्य सुखरूप सुरक्षित आनंदित उज्वल करावं )     संध्याकाळची वेळ होती प्रसन्न वातावरण होते.  श्याम व राम हे दोघे मित्र गप्पा मारत होते. श्याम म्हणत होता,  मी कोणालाच मतदान करणार नाही कारण सर्वच राजकारणी सारखेच आहेत. फक्त स्वतः चा स्वार्थ बघतात . खुर्चीची हाव असते. खुर्चीसाठी ते काहीही करायला तयार असतात. लोकांची , समाजाची देशाची सेवा करायच्या नावाखाली राजकारण करत असंतोष पसरवत असतात. आणि जातीच्या, धर्माच्या, महागाई च्या नावाखाली आपसात भांडण करीत असतात .  तेव्हा राम बोलू लागला अरे मित्रा श्याम तू अगदी बरोबर बोलतोस . सगळीकडे गोंधळ मांडलाय. सर्व पातळीवर राजकारण करत आपली स्वतः ची पोट भरताय . मग आपण मत कोणाला द्यायचं? का द्यायचाच नाही?  राम अतिशय गंभीर होऊन बोलू लागला जर आपण मतच केले नाही तर काय होईल?  आपल एक मत गेले तर काय असं मोठ वादळ निर्माण होणार आहे ?...