डिंकाचे लाडू*(कल्पक कथा
 *डिंकाचे लाडू*(कल्पक कथा) एक आटपाट नगर होते त्या नगरात नरेंद्र नावाचा एक गृहस्थ राहत होता . संध्याकाळच्या वेळेला मित्रांसोबत गप्पा मारत असताना आपल्या आवडत्या खाण्याच्या पदार्थांवर चर्चा होत होती त्याच वेळेस प्रत्येक जण आपापल्या आवडत्या खाण्याच्या पदार्थांचे नाव सांगत होते आणि तो का  आवडतो आणि तो मिळण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात यावर बोलत होते . थोड्यवेळाने नरेंद्र अतिशय गंभीरता पूर्वक बोलू लागला. नरेंद्र म्हणाला. डिंकाचे लाडू म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटले का?   हो माझ्या पण . !! जगामध्ये माझ्या आवडत्या पदार्थापैकी एक. गावात डिंकाचे लाडूचां तयार होण्याचा वास आला की मी नकळत त्या घराजवळ जाऊन उभे राहायचो . माझ्या आयुष्यात डिंकाच्या लाडूचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.  मी लहान असताना म्हणजे पाच वर्षाचा असताना माझी मोठी बहीण बाळंतपणासाठी आमच्या घरी आली होती. आमच्या घराची परिस्थिती अतिशय नाजूक असल्यामुळे बहिणीसाठी लाडू व सुका मेवा आणायची आमची ऐपत नव्हती. म्हणून बहिणीच्या जेठाने लाडूचा सामान आणून दिला व तिच्या नणंदने ते तयार करून दिले.  झाले मी शाळेत गेलो होतो ,!! घरी आल्याव...