विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक २०२५ डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे मानक परिषद मानक इंग्लिश मध्ये स्टँडर्ड ,ही परिषद संपूर्ण विषयाचे ,विद्यार्थ्यांचे ,शिक्षकाचे व इतर सर्व कर्मचाऱ्याचे मानक ठरवील. उदा. व्यावसायिक शिक्षण कोर्स चा कालावधी ,सिलॅबस ,शिक्षक, जागा, रचना, बांधकाम ,आवश्यक सुविधा ,अत्यावश्यक गरजा , मूलभूत शैक्षणिक गरजा, कर्मचारी, खर्च, फी ,परीक्षा पद्धती, निकाल पद्धती, teaching learning प्रोसेस याबरोबरच शिक्षकाचा दर्जा ,विद्यार्थ्यांचा दर्जा हे निश्चित करील. स्किल based शिक्षण घेण्यासाठी अत्यावश्यक त्या पद्धती. मूल्यांकन पद्धती व प्रात्यक्षिक शिक्षण हे आवश्यक आहे. आता विषय असा आहे की अलग अलग विद्यापीठ, स्वायत्त विद्यापीठ ,कॉलेज हे आपल्या आपल्या क्षमतेनुसार अभ्यासक्रम तयार करतात .पण त्याची विषमता ही अधिक असते. एक स्टँडर्ड अभ्यासक्रम हा ठरविला गेला पाहिजे की सर्वमान्य असेल . अभ्यासक्रम हा कोणीही एकटा माणूस किंवा एकटी संस्था करू शकत नाही . असंख्य लोकांचा सल्ला व प्रत्यक्ष सहभाग अनिवार्य असला पाहिजे त्यानंतर त्या विषयाचा अभ्यासक्रम ठरविला पाहिजे. अभ्यासक्...
Comments
Post a Comment