परदेशी विद्यापीठ आव्हाने आणि संधी?*
 *परदेशी विद्यापीठ आव्हाने आणि संधी?* प्रा.डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे (9860659246) Email - jahole1974@gmail.com आजकाल सगळीकडे या विषयावर चर्चा आणि चर्चासत्र सुरू आहे. शिक्षणतज्ञ आपापली मते मांडीत आहे. आपली विचारधारा , मतप्रवाह प्रगट करीत आहेत. चांगली गोष्ट आहे की या विषयावर विचार मंथन व्हायलाच पाहिजे. पण हे विचारमंथन उच्च पदस्त अधिकारी आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक स्तरावरील लोकांचे व्हायला पाहिजे. आणि टेबल वर किंवा स्टेज वर नव्हे तर लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी गप्पा चर्चेच्या माध्यमातून विचार मंथन व्हायला पाहिजे. परदेशी विद्यापीठे भारतात येत आहेत हे आव्हान आहे का संधी?  माझ्या मते दोन्हीही.  परदेशी विद्यापीठांचे भारतात स्वागतच आहे. पण आपण आव्हान आणि संधी या दोन्ही बाजूंचा विचार करू. आव्हाने - १)भारतीय शिक्षा नीतीचे अवलंबन करणार आहे का? २)विद्यापीठातील उच्च पदस्थ अधिकारी व विद्यार्थी यांचे प्रमाण कसे असेल? ३)विद्यापीठाचे धोरण, उद्देश  सुरक्षितता कशी असेल? ४)स्थानिक किंवा भारतीय नोकरी चे प्रमाण कसे असेल? ५)विद्यार्थ्यांची निवड ही गुणवत्ता आधारावर सर्व मान्य पर...